Video: सुशांत सिंग राजपूतचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, व्हिडिओ होतोय व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2020 11:07 IST2020-06-30T11:07:02+5:302020-06-30T11:07:15+5:30
सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक इमोशनल होत आहेत.

Video: सुशांत सिंग राजपूतचा हा व्हिडिओ पाहून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी, व्हिडिओ होतोय व्हायरल
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने 14 जून रोजी वांद्रे येथील राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली होती. त्याच्या निधनानंतर त्याच्या कुटुंबासोबत चाहत्यांना खूप मोठा धक्का बसला. अजूनही लोक या धक्क्यातून सावरलेले नाहीत. दोन आठवड्यांहून जास्त काळ उलटला असतानाही अजूनही त्याचे चाहते आणि सहकलाकार सुशांतची आठवण काढत आहे. सध्या सुशांतचे अनेक जुने फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सुशांतचा असाच एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून लोक इमोशनल होत आहेत.
सुशांतचा व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत यात दिसत आहे की, सुशांत एका वृद्ध महिलेसमोर बसला आहे. ती महिला व्हीलचेअरवर आहे. जमिनीवर बसलेला सुशांत त्या महिलेचा हात त्याच्या डोक्यावर ठेवून घेत आशीर्वाद घेत आहे. नंतर सुशांतही तिच्या डोक्यावरून हात फिरवताना दिसत आहे. यावरून तो किती दयाळू आणि प्रेमळ होता हे दिसत आहे.
बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूला 14 दिवस उलटले आहेत. तरीदेखील अद्याप या प्रकरणाचा छडा लागलेला नाही. याउलट हे प्रकरण आणखी गुंतत चाललं आहे. आता मिळालेल्या माहितीनुसार पोलीस त्याच्या कुटुंबाला दुसऱ्या राउंडच्या चौकशीसाठी बोलवणार आहेत.