Video: बॉलिवूडमधल्या मैत्रीबाबत सुशांत सिंग राजपूतने केला होता धक्कादायक खुलासा, त्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 10:18 AM2020-06-17T10:18:37+5:302020-06-17T10:19:14+5:30

सुशांत सिंग राजपूतचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो #JusticeForSushantSinghRajput हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे.

Video: Sushant Singh Rajput made a shocking revelation about friendship in Cineindustry, this video is going viral | Video: बॉलिवूडमधल्या मैत्रीबाबत सुशांत सिंग राजपूतने केला होता धक्कादायक खुलासा, त्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

Video: बॉलिवूडमधल्या मैत्रीबाबत सुशांत सिंग राजपूतने केला होता धक्कादायक खुलासा, त्याचा हा व्हिडिओ होतोय व्हायरल

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने रविवारी वांद्रे येथील राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. त्याच्या निधनाचे वृत्त ऐकून अनेकांना धक्का बसला. त्याच्या निधनानंतर बॉलिवूड व त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे. सध्या सुशांतचे काही जुने व्हिडीओ समोर आले आहेत जे व्हायरल होत आहेत. याशिवाय आता सोशलवर त्याचे अनेक व्हिडीओ व्हायल होत आहेत. अशातच सुशांतच्या मुलाखतीचा एक व्हिडीओ समोर आला आहे ज्यात त्याने सिनेइंडस्ट्रीबद्दल खुलासा केला आहे.


सुशांत सिंग राजपूतचा एक व्हिडीओ समोर आला आहे जो #JusticeForSushantSinghRajput हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर व्हायरल केला जात आहे. हा व्हिडिओ एम.एस. धोनी - द अनटोल्ड स्टोरी या चित्रपटाच्या रिलीजदरम्यानचा आहे. या व्हिडिओत जेव्हा सुशांतला त्याच्या इंडस्ट्रीतल्या मित्रांबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला, 'माझे फक्त दोनच मित्र आहे. असे नाही की, मी लोकांना पसंत करत नाही. मला लोक आवडतात. मात्र अनेकदा त्यांना माझे बोलणे इंटरेस्टिंग वाटत नाही. पहिल्यांदा तर ते मला पसंत करण्याचा दिखावा करतात. नंतर मग माझा कॉलही उचलत नाही.'


सुशांतचा हा व्हिडीओ सध्या सोशलवर व्हायरल होत आहे. अनेकांनी हा व्हिडीओ ट्विटरवर रिट्विटही केला आहे.

Web Title: Video: Sushant Singh Rajput made a shocking revelation about friendship in Cineindustry, this video is going viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.