"अरे सांभाळून प्लीज...", श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज; नम्रपणा पाहून भारावले नेटकरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2023 11:46 IST2023-10-11T11:40:51+5:302023-10-11T11:46:12+5:30
श्रद्धा कपूरने मराठीत संवाद साधून मराठी चाहत्यांची मने जिंकली.

Shraddha Kapoor
बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री उत्तम मराठी बोलतात. अशीच एक अभिनेत्री म्हणजे, श्रद्धा कपूर. विशेष बाब म्हणजे, ती शुद्ध मराठीत बोलते. अनेक ठिकाणी ती आवर्जुन मराठीतच संवाद साधताना दिसून येते. पुन्हा एकदा तिने मराठीत संवाद साधून मराठी चाहत्यांची मने जिंकली. यावेळी तिच्यातला नम्रपणा सर्वांनी अनुभवला. पापाराझींशी मराठीत बोलतानाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
श्रद्धा कपूर नुकतीच एके ठिकाणी शूटींगच्या कामासाठी पोहोचली असता पापाराझींनी तिला कॅमेऱ्यात कैद केले. पांढरा टी टॉप आणि केशरी स्कर्टमध्ये श्रद्धा दिसली. तिचे फोटो काढत असताना एका एका फोटोग्राफरचा पाय वायरमध्ये अडकतो आणि त्याचा तोल जातो. तेवढ्यात "अरे सांभाळून प्लीज" असे श्रद्धा त्याला म्हणते. श्रद्धा व्हॅनिटीमध्ये जाण्याआधी पापाराझी म्हणते, "अरे थांबा, मी येते ना". या व्हिडीओवर कमेंट करत नेटकरी श्रद्धाच्या या स्वभावाचं आणि या मराठमोळ्या अंदाजाचं कौतुक करत आहेत.
श्रद्धा नुकतीच 'तू झुठी मै मक्कार' या सिनेमात दिसली. यातील तिची आणि रणबीर कपूरची जोडी खूपच पसंत केली गेली. सध्या ती तिच्या आगामी प्रोजेक्ट्स मध्ये व्यस्त आहे. शिवाय, राजकुमार रावसोबत 'स्त्री २' या हॉरर कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. अमर कौशिक यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या या चित्रपटात अपारशक्ती खुराना, अभिषेक बॅनर्जी आणि पंकज त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 'स्त्री २' ऑगस्ट २०२४ मध्ये थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.