Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2018 21:20 IST2018-10-08T21:19:58+5:302018-10-08T21:20:58+5:30

अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे.

Video: Rishi Kapoor An Anupam Kher In Newyork,Had Long Chat & Share Beautiful Moment | Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल

Video: न्यूयॉर्कच्या रस्त्यावर 'मिल बैठे दो यार'.... चिंटू कपूर आणि त्यांच्या जुन्या मित्रामध्ये रंगली गप्पांची मैफल

प्रसिद्ध अभिनेता ऋषी कपूर सध्या वैद्यकीय उपचारांसाठी अमेरिकेत आहेत. त्यांना नेमकं काय झालं आहे, कोणत्या आजारानं त्यांना ग्रासलंय याबाबत त्यांच्या फॅन्समध्ये चिंतेचं वातावरण आहे. सोशल मीडियावर विविध अफवाही पसरल्या होत्या. मात्र याच दरम्यान ऋषी कपूर यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर त्यांच्या फॅन्ससाठी चर्चेचा विषय ठरला आहे. अमेरिकेत न्यूयॉर्कच्या रस्त्यावर फेरफटका मारत असल्याचा त्यांचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. स्वतः ऋषी कपूर यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्यासोबत असणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून अभिनेता अनुपम खेर हे आहे. आपल्या जुन्या मित्रासह तणावमुक्त जीवनाचा आनंद घेत असल्याचे ऋषी कपूर यांनी ट्विटमध्ये नमूद केले आहे.



 

ऋषी कपूर यांच्याप्रमाणेच अनुपम खेर यांनीही हा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. ऋषी कपूर यांना भेटून बरं वाटल्याची पोस्ट त्यांनी या व्हिडीओसह शेअर केली आहे. यावेळी विविध विषयांसह भारतातील अनेक गोष्टींवर गप्पा मारुन छान वाटल्याचेही खेर यांनी सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनुपम खेर हे एका मालिकेच्या शूटिंगसाठी अमेरिकेत आहेत. ऋषी कपूर काही दिवसांपूर्वीच वैद्यकिय उपचारांसाठी अमेरिकेत आले आहेत. वैद्यकिय उपचारांमुळे ते आई कृष्णा कपूर यांच्या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहू शकले नव्हते. ऋषी कपूर अचानक अमेरिकेत गेल्याने त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरलं होतं. त्यांना कॅन्सर झाल्याच्या अफवाही पसरल्या होत्या. मात्र या निव्वळ अफवा असल्याचे कपूर कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. लवकरच ऋषी कपूर यांच्या काही वैद्यकीय चाचण्या होतील आणि त्यांनंतरच त्यांच्या आजाराचं निदान होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. 

मी उपचारासाठी अमेरिकेत जातोय. मी लवकर परत येईल. कृपया कुठलेही तर्क काढू नये, असे ट्विट त्यांनी केले होते. अर्थात आपल्या आजाराबद्दल त्यांनी कुठलाही खुलासा केला नव्हता. तसेच ऋषी कपूर यांच्या आजारपणामुळे तूर्तास जुही चावलासोबतच्या त्यांच्या एका चित्रपटाचे शूटींग थांबवण्यात आले आहे.

Web Title: Video: Rishi Kapoor An Anupam Kher In Newyork,Had Long Chat & Share Beautiful Moment