VIDEO: माधुरी दीक्षित आणि वहिदा रेहमान यांचा 'पान खाये सैंयाँ हमारो'वर दिलखेचक डान्स!, व्हिडीओ झाला व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2021 20:25 IST2021-03-23T20:24:35+5:302021-03-23T20:25:05+5:30

डान्स दिवाने या शोच्या मंचावर नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी दीक्षित यांनी त्यांच्यासोबत पान खाये सैंयाँ हमारो या गाण्यावर डान्स केला.

VIDEO: Madhuri Dixit and Waheeda Rehman's heartwarming dance on 'Paan Khaye Sainya Hamaro' !, Video goes viral | VIDEO: माधुरी दीक्षित आणि वहिदा रेहमान यांचा 'पान खाये सैंयाँ हमारो'वर दिलखेचक डान्स!, व्हिडीओ झाला व्हायरल

VIDEO: माधुरी दीक्षित आणि वहिदा रेहमान यांचा 'पान खाये सैंयाँ हमारो'वर दिलखेचक डान्स!, व्हिडीओ झाला व्हायरल

बॉलिवूडची धकधक गर्ल म्हणजेच माधुरी दीक्षितने बॉलिवूडमध्ये बरेच सुपरहिट सिनेमे दिले असून आताही ती इंडस्ट्रीत एक्टिव्ह आहे. सध्या ती टेलिव्हिजनवरील डान्स रिएलिटी शो डान्स दिवाने ३ची परीक्षक आहे. या शोमधील ती तिच्या वेगवेगळ्या लूकने चाहत्यांना भुरळ पाडताना दिसते. मात्र नुकतेच तिने या शोमध्ये आपल्या डान्समधील दिलखेचक अदांनी सर्वांना घायाळ केले आहे.

डान्स दिवाने या शोच्या मंचावर नुकतेच ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी माधुरी दीक्षित यांनी त्यांच्यासोबत पान खाये सैंयाँ हमारो या गाण्यावर डान्स केला. या गाण्यावरील दोघांच्या अदा खूपच दिलखेचक होत्या. माधुरी दीक्षितने हा व्हिडीओ सोशल मीडिया इंस्टाग्रामवर शेअर केला आहे आणि या व्हिडीओला चाहत्यांची खूप पसंती मिळते आहे. त्यांच्या या व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतो आहे. 


या भागात माधुरी दीक्षितने परिधान केलेला आउटफिट चाहत्यांना खूप भावला. तिने व्हाइट शर्ट आणि गुलाबी रंगाचा स्कर्ट परिधान केला होता. या आउटफिटमधील तिच्या नेकलेसने तिच्या सौंदर्याला चारचाँद लावले आहेत.


माधुरीने 1984 साली अबोध चित्रपटातून करियरची सुरूवात केली होती. पहिलाच चित्रपट सुपरफ्लॉप ठरला होता. त्यानंतर 1988 साली रिलीज झालेल्या तेजाब सिनेमातून ती लोकप्रिय झाली. त्यातील एक, दो, तीन.. हे गाणं आजही प्रेक्षकांच्या चांगलंच लक्षात आहे.

याशिवाय माधुरीने बऱ्याच सिनेमात काम केले आहे. मराठीतही बकेट लिस्ट चित्रपटात ती झळकली होती. माधुरी शेवटची टोटल धमाल या चित्रपटात दिसली होती. 

Web Title: VIDEO: Madhuri Dixit and Waheeda Rehman's heartwarming dance on 'Paan Khaye Sainya Hamaro' !, Video goes viral