Video : तोंडाला मास्क, डोळ्याला काळा चष्मा अन् व्हील चेअरवर 'कपिल शर्मा'
By महेश गलांडे | Updated: February 22, 2021 19:14 IST2021-02-22T19:13:43+5:302021-02-22T19:14:59+5:30
कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे.

Video : तोंडाला मास्क, डोळ्याला काळा चष्मा अन् व्हील चेअरवर 'कपिल शर्मा'
मुंबई - कॉमेडियन कपिल शर्मा सोमवारी मुंबईत विमानतळावर उतरला, त्यावेळी चक्क व्हील चेअरवरुन कपिलला पार्कींगस्थळावर नेण्यात आले. तोंडाला मास्क, डोळ्यावर काळा गॉगल आणि काळा पोशाख परिधान करत कपिल शर्मा पार्कींगच्या दिशेने जाताना स्पॉट झाला आहे. बॉलिवूड पॅपने हा व्हिडिओ शूट केला असून आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्टही केला आहे. व्हायरल बयानीकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
कॉमेडियन कपिल शर्माचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये कपिल शर्मा एका व्हील चेअरवर बसलेला असून त्याला ढलकत ढकलत पार्किंगच्या दिशेने नेण्यात येत आहे. यावेळी, तेथील कॅमेरामन आणि फोटोग्राफर्सने कपिलचा व्हिडिओ शूट केला आहे. मात्र, कॅमेरामन यांनी केलेला पाठलाग कपिलला अजिबात रुचला नाही. म्हणून, कपिलने कॅमेरामन यांना सुनावलं.
ओये हटो पिछे सारे तुम लोग, तुम लोग बत्तमिजीयाँ करते हो.. असे म्हणत कपिलने फोट्रोग्राफर्संना सुनावले. तर, कपिलच्या सहकाऱ्यानेही शूट केलेला व्हिडिओ डिलीट करण्याबाबत कॅमेरामनला सांगितले. मात्र, कॅमेरामनने नकार दिला असून सध्या कपिलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तसेच, कपिलचा हा अवतार पाहून चाहत्यांनाही आश्चर्याचा धक्का बसलाय. कपिलला नेमकं काय झालंय, असा प्रश्न कपिलच्या चाहत्यांना आणि नेटीझन्सला पडला आहे.