VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 12:01 PM2021-12-28T12:01:52+5:302021-12-28T12:02:33+5:30

दीपिका (Deepika Padukone) अलिकडे कुठे ना कुठे स्पॉट होत असते. नुकताच तिचा 83 सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे तिची चर्चा जोरदार सुरू आहे.

VIDEO : Deepika Padukone bag was snatched by some people | VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून

VIDEO : दीपिका पादुकोणला बघून आउट ऑफ कंट्रोल झाले लोक, अभिनेत्रीला जावं लागलं पळून

googlenewsNext

दीपिका पादुकोण (Deepika Padukone) जिथेही जाते तिथे तिचे फॅन्स जमा होतात. असंच त्या दिवशी झालं. ती रेस्टॉरन्टमधून बाहेर येत होती. गर्दी पाहून दीपिका घाबरली नाही, पण याच गर्दीत तिच्यासोबत एक घटना घडता घडता राहिली. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दीपिका अलिकडे कुठे ना कुठे स्पॉट होत असते. नुकताच तिचा 83 सिनेमा रिलीज झाला. त्यामुळे तिची चर्चा जोरदार सुरू आहे. यावर्षी फेब्रुवारीमध्ये दीपिका आपल्या सिनेमाचं शूटींग संपवून दीपिका मुंबईतील एका रेस्टॉरंटमध्ये जेवायला गेली होती. दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी आलेली दीपिका अडचणीत सापडली होती. रेस्टॉरन्टसमोर तिला बघण्यासाठी मोठी गर्दी जमा झाली होती. 

इथे दीपिकासोबत अशी घटना घडली ज्याची कल्पना तिनेही केली नसेल. रेस्टॉरंन्टबाहेर फोटोग्राफर्ससोबत तिचे अनेक फॅन्सही जमा झाले होते. बॉडीगार्ड कसेतरी तिला गाडीपर्यंत पोहोचवत होते. तरी सुद्धा गर्दीतून कुणीतरी तिची बॅग खेचली. बॅग खेचल्याचं तिच्या अचानक लक्षात आलं. या घटनेने ती शॉक्ड झाली. 

दीपिकाची बॅग खांद्यावर लटकवलेली होती. ती कुणीतरी खेचली. पण वेळीच तिच्या लक्षात आलं म्हणून बॅग चोरी होण्यापासून रोखता आली. हे सगळं घडलं असूनही दीपिका शांत होती. ती कारमध्ये बसली आणि निघून गेली.
 

Web Title: VIDEO : Deepika Padukone bag was snatched by some people

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.