Video : ‘या’ मुलाने केला राखी सावंतच्या पतीला बघितल्याचा दावा; म्हणे, जीजू खूप श्रीमंत आहेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2019 10:29 IST2019-09-26T10:29:20+5:302019-09-26T10:29:58+5:30

राखी पती कोण, कसा दिसतो, हे कुणालाही ठाऊक नाही. पण आता मात्र राखीच्या लग्नाचा एक पुरावा समोर आला आहे. होय, एका प्रत्यक्षदर्शीने राखीच्या पतीला पाहिल्याचा दावा केला आहे.

Video: this boy seen rakhi sawant husband explained as too handsome and rich | Video : ‘या’ मुलाने केला राखी सावंतच्या पतीला बघितल्याचा दावा; म्हणे, जीजू खूप श्रीमंत आहेत

Video : ‘या’ मुलाने केला राखी सावंतच्या पतीला बघितल्याचा दावा; म्हणे, जीजू खूप श्रीमंत आहेत

ठळक मुद्देआता हा व्हिडीओ खरा की खोटा, हा मुलगा कोण, कुठला, हे आम्हाला ठाऊक नाही. पण हो, हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय.

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतचे लग्न आणि तिचा पती याबद्दलचा सस्पेन्स संपण्याची चिन्हे नाहीत. गेल्या काही दिवसांपासून यावरून रोज नवा ड्रामा रंगतोय. सर्वप्रथम राखीने सीक्रेट मॅरेज केल्याची बातमी आली. सुरुवातीला राखीने ही बातमी नाकारली. पण यानंतर दोनच दिवसांत होय, माझे लग्न झाले. माझा पती एनआरआय असून त्याचे नाव रितेश असल्याचे सांगून तिने खळबळ उडवून दिली. मग काय, यानंतर नववधूच्या पोशाखातील अनेक फोटो राखीने शेअर केलेत. पण पतीचा चेहरा मात्र तिने जाणीवपूर्वक लपवला. अद्यापही राखी हा पती कोण, कसा दिसतो, हे कुणालाही ठाऊक नाही. पण आता मात्र राखीच्या लग्नाचा एक पुरावा समोर आला आहे. होय, एका प्रत्यक्षदर्शीने राखीच्या पतीला पाहिल्याचा दावा केला आहे.


विशेष म्हणजे, राखीने स्वत: या प्रत्यक्षदर्शीचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत एक ऑरेंट टी-शर्ट घातलेला मुलगा दिसतोय आणि तो राखीच्या पतीबद्दल बोलतोय. ‘हाय राखी मॅम, आज मी रितेश जीजूला माझ्या डोळ्यांनी पाहिले. जीजू दिसायला फारच हँडसम आहे. तुम्ही विश्वास करणार नाही. तुम्ही राखी मॅमला खोटे समजता. राखी मॅगचे लग्न सगळे काही खोटे आहे, असे तुम्हाला वाटते. पण जेव्हा तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी बघाल, तेव्हा तुमचे डोळे दिपतील. आज मी रितेश जीजूला अंबानी फॅमिलीच्या घराबाहेर पाहिले. ते आज आले होते आणि त्यांच्याकडे Lamborghini आहे. ते खूप श्रीमंत आहेत,’ असे हा मुलगा सांगतोय. इतकेच नाही तर ‘त्यांच्याकडे इतके डॉलर आणि पाउंड आहेत की, आज ते हवेत उधळत होते. राखी मॅडमलाही ते 5 कोटी पाउंड देऊन गेलेत. तुम्हाला सगळे खोटे वाटते. तुम्ही वेडे आहात,’असेही त्याने या व्हिडीओ सांगितले आहे.


आता हा व्हिडीओ खरा की खोटा, हा मुलगा कोण, कुठला, हे आम्हाला ठाऊक नाही. पण हो, हा व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होतोय. साहजिकच पुन्हा एकदा राखी चर्चेत आहे.

Web Title: Video: this boy seen rakhi sawant husband explained as too handsome and rich