Video: अंबानींच्या सोहळ्यात तीनही खानचीच चर्चा, स्टेजवर 'नाटू नाटू' गाण्यावर केला भन्नाट डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 10:49 AM2024-03-03T10:49:35+5:302024-03-03T10:50:18+5:30

सलमान, शाहरुख आणि आमिरने आणली प्री वेडिंग सोहळ्यात रंगत, बॉलिवूडप्रेमींसाठी खास क्षण

Video: At Ambani's party, all the three Khans were discussed, danced on the stage to the song 'Natu Natu' | Video: अंबानींच्या सोहळ्यात तीनही खानचीच चर्चा, स्टेजवर 'नाटू नाटू' गाण्यावर केला भन्नाट डान्स

Video: अंबानींच्या सोहळ्यात तीनही खानचीच चर्चा, स्टेजवर 'नाटू नाटू' गाण्यावर केला भन्नाट डान्स

गुजराच्या जामनगर येथे सध्या मोठा उत्साह पाहायला मिळतोय. रिलायन्सचे संचालक देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Aambani) यांच्या धाकट्या लेकाचं प्री वेडिंग सेलिब्रेशन सुरु आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट जुलैमध्ये  लग्नबंधनात अडकणार आहेत. १ मार्च पासून सुरु झालेल्या या प्री वेडिंगमध्ये पहिल्याच दिवशी हॉलिवूड स्टार गायिका रिहानाच्या परफॉर्मन्सने रंगत आणली. तर दुसऱ्या दिवशी बॉलिवूडप्रेमींना तीनही खान च्या डान्सची पर्वणी मिळाली. 

सलमान खान (Salman Khan), शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आमिर खान (Aamir Khan)हे तिघेही एकत्र येतात तो क्षण कमालच असतो. बॉलिवूडप्रेमी तर अशा क्षणांची आतुरतेने वाट पाहत असतात. अंबानींच्या सोहळ्यात अख्खं बॉलिवूड जामनगरमध्ये असताना तीनही खान सुद्धा एकत्र आले. तिघांनी स्टेजवर एकत्र डान्स करत आग लावली. विशेष म्हणजे त्यांनी RRR सिनेमातील लोकप्रिय 'नाटू नाटू' गाण्यावर डान्स केला. त्यांना नाटू नाटूची हूक स्टेप काही जमली नाही. म्हणून शेवटी सलमान खानच्या प्रसिद्ध 'ओ ओ जाने जाना'वर थिरकत त्यांनी धमाल केली. नंतर आमिर खानच्या रंग दे बसंती चीही स्टेप केली. तसंच शाहरुख खानची आयकॉनिक पोज दिली. त्यांच्या या परफॉर्मन्सवर टाळ्या आणि शिट्ट्यांचा कडकडाट झाला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

तीनही खानच्या या व्हिडिओवर नेटकऱ्यांनीही त्यांची मजा घेतली आहे. 'अंबानींनाच तीनही खान परवडू शकतात', 'खूपच भारी क्षण' म्हणत कोणी चेष्टा केली आहे तर कोणी कौतुक केलं आहे.

अंबानींच्या या प्री वेडिंग फंक्शनचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या जिकडे तिकडे फक्त या सोहळ्याचीच चर्चा आहे. आजच अमिताभ बच्चनही जामनगरला पोहोचले आहेत. काल जामनगरमध्ये बॉलिवूड कलाकारांचीच मांदियाळी होती. अगदी मुकेश अंबानी यांनी पत्नी नीता अंबानींसोबत रोमँटिक गाण्यावर डान्स केला. तर अनंत अंबानीच्या भाषणाने मुकेश यांच्या डोळ्यात पाणी आलं. राधिका मर्चंटने नीता अंबानींचं केलेलं कौतुक, अनंतचा वंतारा प्रोजेक्ट असे अनेक खास क्षण सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले आहेत.

Web Title: Video: At Ambani's party, all the three Khans were discussed, danced on the stage to the song 'Natu Natu'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.