Video : अनुष्का शर्मासोबत चाहत्यांना काढायची होती सेल्फी, मात्र तिच्या हरकती पाहून लोकांना बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2018 14:27 IST2018-11-29T14:24:35+5:302018-11-29T14:27:19+5:30

सिंगापूरमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये गेल्या आठवड्यात अनुष्का शर्माच्या वॅक्स स्टॅचूचे अनावरण करण्यात आले आणि यावेळी अनुष्काने प्रँक करीत चाहत्यांना घाबरवले.

Video: anushka-sharma-turns-prankster-as-she-unveil-madame-tussauds-statue-in-singapore-video-out | Video : अनुष्का शर्मासोबत चाहत्यांना काढायची होती सेल्फी, मात्र तिच्या हरकती पाहून लोकांना बसला धक्का

Video : अनुष्का शर्मासोबत चाहत्यांना काढायची होती सेल्फी, मात्र तिच्या हरकती पाहून लोकांना बसला धक्का

ठळक मुद्देअनुष्का शर्मा बनली प्रँकस्टारसेल्फी काढायला आलेल्या चाहत्यांना घाबरवले अनुष्काने

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने नुकतेच सिंगापूरमधील मादाम तुसाँ म्युझियममधील तिच्या वॅक्सच्या पुतळ्याचे अनावरण केले. मनोरंजक बाब ही आहे की हा पुतळा बोलतो. अनुष्का भारतातील पहिली स्टार आहे जिचा बोलका स्टॅच्यू बनवण्यात आला आहे. या म्युझियममधील अनुष्काचा इंटरेस्टिंग व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात तिचा पुतळा चाहत्यांना घाबरवताना दिसतो आहे.


अनुष्का शर्मा खऱ्या आयुष्यात प्रँकस्टार आहे आणि याचा प्रत्यय सिंगापूरमधील मादाम तुसाँ म्युझियममध्ये आला. तिचा लेटेस्ट व्हिडिओ पाहिल्यावर तुम्हालाही याची प्रचिती येईल. सिंगापूरमध्ये कोणी तिचे चाहते तिच्यासोबत सेल्फी घ्यायला आले की त्यांना घाबरवताना दिसली. 


याबाबत अनुष्का म्हणाली की, मला आनंद आहे की मादाम तुसाँ सिंगापूरमध्ये पहिल्यांदाच माझा बोलणारा मेणाचा पुतळा बनवण्यात आला. चाहत्यांचे प्रेम व त्यांच्या पाठिंब्यासाठी मी खूप आभारी आहे. 

सिंगापूरच्या मादाम तुसाँ म्युझियममध्ये काजोल, शाहरूख खान, अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, माधुरी दीक्षित, करिना कपूर व रणबीर कपूर या कलाकारांचे मेणाचे पुतळे आहेत. 
सध्या अनुष्का शर्मा झिरो चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या चित्रपटात तिच्यासोबत शाहरूख खान व कतरिना कैफ मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 

Web Title: Video: anushka-sharma-turns-prankster-as-she-unveil-madame-tussauds-statue-in-singapore-video-out