विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड म्हणते,‘बाकी सब फर्स्ट क्लास हैं’; व्हिडीओ व्हायरल!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 17:55 IST2019-04-07T17:50:10+5:302019-04-07T17:55:02+5:30
अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय.

विकी कौशलची एक्स गर्लफ्रेंड म्हणते,‘बाकी सब फर्स्ट क्लास हैं’; व्हिडीओ व्हायरल!
‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाचा अभिनेता विकी कौशल याची गर्लफ्रेंड हरलीन सेठी हिचे नाव आता सगळयांच्याच ओळखीचे झाले आहे. विकीसोबतचे ब्रेकअप आणि पॅचअप यामुळे ती कायम चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्याही बातम्या होत्या. आता मात्र ती एका वेगळयाच कारणामुळे चर्चेत आलीय. ते म्हणजे ‘कलंक’ चित्रपटाचा अभिनेता वरूण धवन याच्यासोबतच्या ‘फर्स्ट क्लास’ व्हिडीओमुळे. ब्रेकअपनंतर हरलीनचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत ‘फर्स्ट क्लास’ या गाण्यावर हरलीन आणि वरुण डान्स करताना दिसत आहेत. हरलीननं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.
धर्मा प्रॉडक्शनचा बहुचर्चित ‘कलंक’ हा चित्रपट येत्या १७ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटातील गाणी त्याआधी चांगलीच प्रसिद्ध झाली आहेत. वरुणच्या ‘फर्स्ट क्लास’ या गाण्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. अरिजीत सिंगने गायलेल्या या गाण्याने तरुणाईवर जादूच केली आहे. कोरिओग्राफर मेलवीन लुईस सुद्धा हरलीनच्या व्हिडिओत दिसत आहे. यातील हरलीन आणि वरुणची केमिस्ट्री त्यांच्या चाहत्यांच्या पसंतीत उतरली आहे.
वरुण धवनच्या ‘कलंक’ या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. वरुणसोबतच आलिया भट्ट, सोनाक्षी सिन्हा, माधुरी दीक्षित, आदित्य रॉय कपूर, संजय दत्त यांच्या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाच्या निमित्ताने संजय दत्त आणि माधुरी तब्बल १२ वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत.