'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2023 04:35 PM2023-10-13T16:35:38+5:302023-10-13T16:37:08+5:30

विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सॅम बहादूरचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विकीचं कौतुक केलं आहे. केवळ चाहतेच नाही तर विकीचा अभिनय पाहून बॉलिवूड अभिनेतेही भारावून गेले आहेत.

vicky kausal sam bahadur teaser released bollywood celebrities and netizens praising actor for his work | 'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक

'सॅम बहादूर'च्या टीझरमध्येच दिसली विकीच्या दमदार अभिनयाची झलक; नेटकरी भारावले, बॉलिवूडमधूनही होतंय कौतुक

बॉलिवूड अभिनेता विकी कौशल त्याच्या आगामी 'सॅम बहादूर' या चित्रपटामुळे चर्चेत आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतंच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. 'सॅम बहादूर'चा टीझर पाहून चाहत्यांची या चित्रपटाबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. पण, हा टीझर पाहिल्यानंतर चाहत्यांबरोबरच बॉलिवूड सेलिब्रिटीही थक्क झाले आहेत. 

'सॅम बहादूर'चित्रपटात विकी कौशल मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो भारतीय लष्कर अधिकारी सॅम माणेकशॉ यांची भूमिका साकरत आहे. टीझर पाहून विकी कौशल या भूमिकेसाठी चपखल बसल्याचं दिसून येतं. विकीने या भूमिकेला अगदी पूरेपूर न्याय दिल्याचं टीझरमधून जाणवत आहे. त्याचा दमदार अभिनय आणि चोख संवादफेक याचं सर्वत्र कौतुक होत आहे. विकीने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन सॅम बहादूरचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टवर चाहत्यांनी कमेंट करत विकीचं कौतुक केलं आहे. 

"हा विकीचा शो आहे", अशी कमेंट एका चाहत्याने केली आहे. "हे फक्त विकीच करू शकतो", असंही एकाने म्हटलं आहे. केवळ चाहतेच नाही तर विकीचा अभिनय पाहून बॉलिवूड अभिनेतेही भारावून गेले आहेत. वरुण धवनने कमेंट करत "छान विकी" असं म्हटलं आहे. तर अर्जुन कपूरने "सगळे अवॉर्ड लॉक झाले आहेत," अशी कमेंट केली आहे. फरहान अख्तरने कमेंट केली आहे. मराठी अभिनेता अमेय वाघने "हरहुन्नरी आणि चकाकी", असं म्हटलं आहे. 

'सॅम बहादूर' चित्रपटातून फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर मांडण्यात येणार आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. या चित्रपटात सान्या मल्होत्राने सॅम बहादूर यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे. तर फातिमा शेख इंदिरा गांधींच्या भूमिकेत आहे. १ डिसेंबरला बहुचर्चित 'सॅम बहादूर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: vicky kausal sam bahadur teaser released bollywood celebrities and netizens praising actor for his work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.