बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2025 16:11 IST2025-10-15T16:11:24+5:302025-10-15T16:11:50+5:30
ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचं निधन झालं आहे. आज (१५ ऑक्टोबर) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या.

बॉलिवूडवर शोककळा! पंकज धीर यांच्यानंतर दिग्गज अभिनेत्री मधुमती यांचं निधन, ८७व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
बॉलिवूडसाठी आज दु:खाचा दिवस आहे. अभिनेता पंकज धीर यांचं कॅन्सरने निधन झालं. त्यानंतर आता आणखी एका दिग्गज अभिनेत्रीच्या निधनाची बातमी समोर येत आहे. ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती यांचं निधन झालं आहे. आज (१५ ऑक्टोबर) सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या ८७ वर्षांच्या होत्या. अभिनेता विंदू दारा सिंह यांनी त्यांच्या निधनाबाबत सोशल मीडियावरुन चाहत्यांना माहिती दिली आहे. मधुमती यांना पोस्टमधून त्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
अभिनेत्री असण्यासोबत मधुमती या एक उत्तम नृत्यांगणा होत्या. त्यांनी १९५७ साली एका मराठी चित्रपटात डान्सर म्हणूनच अभिनय क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली होती. पण, तो सिनेमा कधी रिलीज झाला नाही. लहानपणापासूनच त्यांना डान्सची आवड होती. भरतनाट्यम, कथ्थक, मनिपुरी आणि कथकली अशा नृत्यप्रकारात त्या पारंगत होत्या. काही सिनेमांमध्येही नृत्य करताना दिसल्या होत्या.
Rest in peace our teacher and guide #Madhumati ji. A beautiful life led filled with love and blessings from so many of us who learnt dancing from this legend 🙏🏻 pic.twitter.com/eRRZ3W1LOx
— Vindu Dara Singh (@RealVinduSingh) October 15, 2025
उत्तम डान्स आणि चेहऱ्यातील साम्यामुळे मधुमती यांची तुलना हेलन यांच्यासोबत केली जायची. मधुमती यांनी वयाच्या १९व्या वर्षी मनोहर दीपक यांच्याशी लग्न केलं होतं. मनोहर दीपक आणि मधुमती यांच्यात वयाचं खूप अंतर होतं. याशिवाय त्यांना चार मुलंही होती. त्यामुळे त्यांच्या आईला हे लग्न मान्य नव्हतं. नृत्याविना मधुमती यांचं जीवन अपूर्ण होतं. शेवटच्या श्वासापर्यंत त्या विद्यार्थ्यांना नृत्य शिकवत होत्या.