वीर दास स्वत:ला मानतो ‘लकी’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2016 18:42 IST2016-11-01T18:42:44+5:302016-11-01T18:42:44+5:30

बॉलिवूडचे अनेक कलाकार उत्तम स्क्रिप्टची वाट पाहत असतात. या कलाकारांच्या लिस्टमध्ये आता अभिनेता वीर दास याचे नाव समाविष्ट झाले ...

Veer Das admits to himself 'Lucky'! | वीर दास स्वत:ला मानतो ‘लकी’!

वीर दास स्वत:ला मानतो ‘लकी’!

लिवूडचे अनेक कलाकार उत्तम स्क्रिप्टची वाट पाहत असतात. या कलाकारांच्या लिस्टमध्ये आता अभिनेता वीर दास याचे नाव समाविष्ट झाले आहे. कारण त्याला ‘३१ आॅक्टोबर’ या चित्रपटाचा भाग होता आल्याने स्वत:ला लकी मानतोय. सोहा अली खानच्या मुख्य भूमिकेतील या चित्रपटाच्या कथानकाला उत्तम प्रतिसाद मिळतोय.

चित्रपटाच्या या  प्रवासाबद्दल बोलताना तो म्हणाला,‘हा खरंतर मला भावुक करणारा क्षण आहे. मी चित्रपटाचा भाग असल्याचा मला अभिमान वाटतोय. अशा अनेक चारित्रकथांवरील चित्रपटांमध्ये काम करायला मला नक्की आवडेल.’ यात त्याने दविंदर सिंग या शिखाची भूमिका केली आहे. इंदिरा गांधींच्या हत्येनंतरचे शीख समाजातील वातावरण कसे होते? यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. या चित्रपटाला पंजाब गव्हर्नमेंटने टॅक्स फ्री घोषित केले आहे.

Web Title: Veer Das admits to himself 'Lucky'!