वरुण-जान्हवीचा 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' उद्या या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 11:28 IST2025-11-26T11:27:49+5:302025-11-26T11:28:10+5:30
मोठ्या पडद्यानंतर थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.

वरुण-जान्हवीचा 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' उद्या या' प्लॅटफॉर्मवर होणार प्रदर्शित
'सनी संस्कार की तुलसी कुमारी' हा चित्रपट २ ऑक्टोबर २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री जान्हवी कपूर यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला होता. शशांक खेतान दिग्दर्शित हा चित्रपट आता मोठ्या पडद्यानंतर थेट ओटीटीवर प्रदर्शित होण्यास सज्ज झाला आहे.
वरुण धवन आणि जान्हवीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी म्हणजे, 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'चा ओटीटी प्रीमियर उद्या २७ नोव्हेंबर २०२५ रोजी होणार आहे. म्हणजेच, उद्यापासून तुम्ही हा चित्रपट घरबसल्या नेटफ्लिक्सवर आरामात पाहू शकता. उद्या नेटफ्लिक्सकडून अधिकृत घोषणा होईल.
'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर यांच्यासोबत सान्या मल्होत्रा आणि रोहित सराफ यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसेच, मनीष पॉल, अक्षय ओबेरॉय आणि अभिनव शर्मा यांसारखे दमदार कलाकार दिसतात. विशेष म्हणजे या चित्रपटात प्राजक्ता माळी हिचा खास कॅमिओदेखील आहे. थिएटरमध्ये चित्रपट पाहण्याची संधी हुकलेल्या चाहत्यांना, वरुण आणि जान्हवीची ही रोमँटिक कॉमेडी आता आता घरबसल्या पाहता येणार आहे.