रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2019 12:18 IST2019-10-07T12:11:10+5:302019-10-07T12:18:34+5:30

दोघांनी ख्रश्चिन पद्धतीने तिसऱ्यांदा विवाह केला.

Varun dhawan shraddha kapoor next movie street dancer 3 | रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा!

रेमो डिसूजाने चक्क तिसऱ्यांदा केले लग्न, लग्नाला पोहोचले वरुण- श्रद्धा!

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूजाच्या लग्नानाला नुकतीच 20 वर्षे पूर्ण झाली आहेत. आयुष्यातील हा क्षण अविस्मरणीय बनवण्यासाठी रेमोने आपली पत्नी लिजेल डिसूजासोबत तिसऱ्यांदा लग्न केले. दोघांनी ख्रश्चिन पद्धतीने तिसऱ्यांदा विवाह केला. 


रेमो आणि लिजेलच्या लग्नाला संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते. याशिवाय या लग्नात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. मात्र या सोहळ्याला वरुण धवनने खास बनवले. या लग्न सोहळ्याचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत वरुणने एक मजेदार कॅप्शन दिले. वरुणने रेमो आणि लिजेलसोबतचा फोटो शेअर करत त्यांना शुभेच्छा देताना लिहिले की, जे लोकांकडून एकदा होता नाही ते यांनी तीन वेळा केलं. 


रेमो आणि लिजलचे लव्ह मॅरेज असून ते एका डान्स ग्रुपमध्ये होते आणि बॅकग्राउंड डान्सर म्हणून काम करत होते. सुरुवातीला असलेली मैत्री नंतर प्रेमात बदलली आणि त्यांनी लग्न केलं. आता त्यांना दोन मुलं आहेत.


रेमोच्या आगामी सिनेमात वरुण धवन ‘स्ट्रिट डान्सर 3'मध्ये दिसणार आहे. रेमोचा हा डान्स बेस्ड चित्रपट ‘एबीसीडी’ या सुपरहिट फ्रेंचाइजीचा तिसरा भाग आहे. आधी या चित्रपटाचे नाव ‘रुल ब्रेकर्स’ असे असल्याचे सांगितले गेले. मात्र आता ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’ या नावाने हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. . ‘स्ट्रिट डान्सर 3 डी’मध्ये वरुण एका पंजाबी तरुणाची भूमिका वठविणार असून श्रद्धा एका पाकिस्तानी डान्सरच्या भूमिकेत दिसणार आहे. पुढच्या वर्षी जानेवारी महिन्यात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटाला येणार आहे. 

Web Title: Varun dhawan shraddha kapoor next movie street dancer 3