लवकरच येणार ‘स्त्री’चा सीक्वल! राजकुमार रावऐवजी दिसणार वरूण धवन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2019 10:12 IST2019-04-04T10:10:42+5:302019-04-04T10:12:10+5:30

‘स्त्री’चे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरु झाली. आता याच सीक्वलबद्दल एक मोठी बातमी आहे. 

varun dhawan to play pivotal role in stree 2 | लवकरच येणार ‘स्त्री’चा सीक्वल! राजकुमार रावऐवजी दिसणार वरूण धवन!!

लवकरच येणार ‘स्त्री’चा सीक्वल! राजकुमार रावऐवजी दिसणार वरूण धवन!!

ठळक मुद्देवरूणने आत्तापर्यंत बदलापूर, हम्टी शर्मा की दुल्हनिया, अक्टूबर, सुई धागा अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांत काम केले आहे. लवकरच तो कलंक या चित्रपटात दिसणार आहे.

राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर यांच्या ‘स्त्री’ हा हॉरर-कॉमेडी चित्रपट गतवर्षी प्रदर्शित झाला आणि चित्रपटावर प्रेक्षकांच्या उड्या पडल्यात. समीक्षकांनीही हा चित्रपट डोक्यावर घेतला. १२९ कोटींची घसघशीत कमाई करून या चित्रपटाने अनपेक्षित धक्का दिला. चित्रपटाचे हे अनपेक्षित यश पाहून मेकर्सनी लगेच ‘स्त्री’चा सीक्वल येणार, हे जाहीर केले आणि या चित्रपटाची तयारी सुरु झाली. आता याच सीक्वलबद्दल एक मोठी बातमी आहे. होय, ‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये राजकुमार राव दिसेल, अशी आस लावून बसलेल्या चाहत्यांसाठी ही बातमी जरा धक्कादायक असू शकते. कारण ताजी बातमी खरी मानाल तर, या सीक्वलमध्ये राजकुमार रावऐवजी अभिनेता वरूण धवनची वर्णी लागू शकते.

सध्या वरूण प्रत्येक शैलीच्या चित्रपटात काम करू इच्छितो. प्रत्येक चित्रपटासोबत चाहत्यांना काही नवे देण्याचा वरूणचा प्रयत्न आहे. त्यामुळे वरूण ‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये काम करण्यास उत्सुक आहेत. अर्थात ‘स्त्री’चे निर्माते दिनेश विजान यांचे राजकुमार रावसोबतचे संबंध बघता, वरूणला या चित्रपटात घ्यावे की नाही, हा निर्णय घेताना निर्मात्यांची जरा गोची होतेय.

निर्माते यातून कसा व काय मार्ग काढतात? ‘स्त्री’च्या सीक्वलमध्ये वरूण वा राजकुमार यादोघांपैकी कुणाची वर्णी लागते, हे लवकरच कळेल.
वरूणने आत्तापर्यंत बदलापूर, हम्टी शर्मा की दुल्हनिया, अक्टूबर, सुई धागा अशा वेगवेगळ्या जॉनरच्या चित्रपटांत काम केले आहे. लवकरच तो कलंक या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय रेमो डिसूजाच्या स्ट्रिट डान्सर या चित्रपटातही त्याची वर्णी लागली आहे.

Web Title: varun dhawan to play pivotal role in stree 2