वरुण धवनचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2020 06:00 IST2020-10-07T06:00:00+5:302020-10-07T06:00:00+5:30

वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर 'बदलापुर', 'मैं तेरा हीरो', 'जुडवा २', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकताच त्याचा 'स्ट्रीट डांसर 3डी' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही होती. याशिवाय लवकरच तो सारा अली खानसोबत 'कुली नंबर १' मध्ये दिसणार आहे.

Varun Dhawan latest click with sexy body and stylish look will stunned you | वरुण धवनचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

वरुण धवनचा लूक फॅन्समध्ये चर्चेचा विषय, पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूकने करतोय साऱ्यांना घायाळ

बॉलीवुडमध्ये सिक्स पॅक अब्सचा ट्रेंड प्रत्येक अभिनेत्याने चांगलाच मेंटेन केला आहे. शाहरुखपासून ते हृतिकपर्यंत सिक्स पॅक अब्सची जादू पाहायला मिळाली. नुकतेच वरुण धवनने त्याचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. सिक्स पॅक अब्स असलेल्या या फोटोवर  तरुणांसह तरुणीही फिदा झाल्यात. याआधीही रसिकांनी त्याचा हटके अंदाजातल्या फोटोंना पसंती दिली आहे. अगदी त्याप्रमाणेच या लूकलाही चाहत्यांची तुफान पसंती मिळत आहे.

सोशल मीडियावरही बराच सक्रीय असतो. या माध्यमातून वरुण आपल्या फॅन्सशी जोडला गेला आहे. त्यांच्याशी तो सोशल मीडियाच्या माध्यमातून फॅन्सशी संवाद साधतो, स्वतःचे फोटो आणि सिनेमाची माहिती तसंच व्हिडीओ तो शेअर करत असतो. त्यामुळे सोशल मीडियावर वरुणच्या या फोटोने चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमधील त्याची बॉडी पाहून कुणीही घायाळ होईल. फोटोमधील आकर्षक तसंच तितकीच पिळदार बॉडी आणि स्टायलिश लूक सध्या साऱ्यांनाच भावतो आहे.

वरुण धवन नुकताच गर्लफ्रेंड नताशा दलालसह गोव्यामध्ये व्हॅकेशन एन्जॉय करताना दिसला होता. काही दिवसांपूर्वीच तो मुंबईत परतला आहे. व्हॅकेशनवरून येताच त्याने आपल्या कामाची सुरूवातही केली आहे.आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगला सुरूवात करण्याआधी वरूणने त्याची कोरोना चाचणी करून घेतली. यासंदर्भातला एक व्हिडीओ त्याने सोशल मीडियावर शेअर केला होता.

वरुणच्या सिनेमांबद्दल बोलायचे झाले तर 'बदलापुर', 'मैं तेरा हीरो', 'जुडवा २', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' अशा सिनेमांमध्ये त्याने काम केलं आहे. नुकताच त्याचा 'स्ट्रीट डांसर 3डी' सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमात त्याच्यासोबत श्रद्धा कपूरही होती. याशिवाय लवकरच तो सारा अली खानसोबत 'कुली नंबर १' मध्ये दिसणार आहे. 'कुली नं.१-२' या सिनेमात त्याने महाराष्ट्रीयन व्यक्तीरेखाच साकारली आहे.

सिनेमात तो खूप मराठी बोलताना दिसणार आहे. याशिवाय शशांक खैतान यांच्या आगामी सिनेमात सात्विक लेले ही व्यक्तीरेखा साकारत आहे. त्यामुळे सलग दोन सिनेमांमध्ये मराठी व्यक्तीरेखा साकारण्याची संधी मिळाली आहे. मराठी संस्कृती मला खूप आवडते. त्यामुळे जर कुणी मराठी सिनेमा ऑफर केला तर मी नक्कीच मराठीत काम करेन असेही त्याने लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. 

Web Title: Varun Dhawan latest click with sexy body and stylish look will stunned you