लेकीचा चेहरा कधी दाखवणार? चाहत्याच्या प्रश्नावर वरुण धवन म्हणाला, "मी हा निर्णय..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2026 16:25 IST2026-01-07T16:24:55+5:302026-01-07T16:25:23+5:30
वरुण धवनने ट्विटरवर आस्क मी सेशन घेतलं. अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले.

लेकीचा चेहरा कधी दाखवणार? चाहत्याच्या प्रश्नावर वरुण धवन म्हणाला, "मी हा निर्णय..."
अभिनेता वरुण धवन सध्या 'बॉर्डर २' सिनेमामुळे चर्चेत आहे. नुकतंच सिनेमाचा म्युझिक लाँच इव्हेंट जैसलमेरमध्ये पार पडला. काहीच दिवसात सिनेमा रिलीज होणार आहे. त्याआधी वरुणने ट्विटरवर चाहत्यांशी संवाद साधला. त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली. यावेळी त्याला लेक राहाचा चेहरा कधी दाखवणार असंही विचारण्यात आलं. यावर त्याने काय उत्तर दिलं वाचा...
वरुण धवनने ट्विटरवर आस्क मी सेशन घेतलं. अनेक चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारले. गेल्या वर्षीच वरुणला मुलगी झाली. पत्नी नताशा दलालने लेकीला जन्म दिला. तिचं नाव लारा असं ठेवण्यात आलं. आता वरुणला चाहत्याने लेकीचा चेहरा कधी दाखवणार असं विचारलं. यावर तो म्हणाला, 'मी हा निर्णय लारावरच सोपवला आहे. जेव्हा तिला वाटेल सोशल मीडियावर यायचं आहे तेव्हा ती तिच्या मर्जीने येईल. मी तिच्यासाठी हा निर्णय घेणार नाही.'
तसंच वरुणला तो कार्तिक आर्यनच्या 'लुका छुपी'च्या सीक्वेलमध्ये दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा तो म्हणाला, 'मी सध्या कोणताही सीक्वेल करण्याच्या विचारात नाही'.
वरुणचा 'बॉर्डर २' २५ जानेवारी रोजी रिलीज होत आहे. सिनेमात सनी देओल, दिलजीत दोसांझ, अहान शेट्टी यांचीही भूमिका आहे. तर मेधा राणा ही नवोदित अभिनेत्री वरुण धवनच्या अपोझिट आहे.