या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 19:33 IST2019-05-02T19:33:28+5:302019-05-02T19:33:52+5:30

‘कुली नंबर १’ या सिनेमाचा रिमेक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Varun Dhawan and Sara Ali Khan share photo and announce release date of Coolie no. 1 remake | या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

या दिवशी प्रदर्शित होणार 'कुली नंबर १', वरूण धवन व सारा अली खान लगावणार रोमांसचा तडका

बॉलिवूडमध्ये सध्या रिमेकचा ट्रेंड असून यात आता आणखीन एका चित्रपटाची भर पडली आहे. १९९५ साली प्रदर्शित झालेला कुली नंबर १ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली होती. आजही या चित्रपटाने रसिकांच्या मनात घर केले आहे. नुकतीच या चित्रपटाच्या रिमेकची घोषणा झाली आहे. १ मे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित केला. या चित्रपटात मुख्य भूमिकेत वरूण धवनसारा अली खान दिसणार आहेत.

त्यांनी आपल्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करीत प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. हा चित्रपट एक वर्षानंतर म्हणजेच १ मे, २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘कुली नंबर १’च्या रिमेकपूर्वी डेव्हिड धवन यांनी १९९७ मध्ये प्रदर्शित ‘जुडवा’चा रिमेक बनवला होता. यात वरूण धवन, जॅकलिन फर्नांडिस व तापसी पन्नू मुख्य भूमिकेत होते. ‘जुडवा 2’आधी वरूणने पापा डेव्हिड धवनच्या ‘मै तेरा हिरो’ या चित्रपटात काम केले आहे.

१९९५ मध्ये रिलीज झालेल्या ‘कुली नंबर १’मध्ये गोविंदा आणि करिश्मा कपूर लीड रोलमध्ये होते. त्यांच्याशिवाय कादर खान, शक्ती कपूर, सदाशिव अमरापूरकर या दिग्गज अभिनेत्यांनी यात महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. ‘कुली नंबर १’ या चित्रपटापासून डेव्हिड धवन यांच्या ‘नंबर १’ सीरिजची सुरुवात झाली. यानंतर हिरो नंबर १, बीवी नंबर १, जोडी नंबर १ असे अनेक चित्रपट त्यांनी बनवले.

जुडवाच्या रिमेकला बॉक्स ऑफिसवर हवा तितका प्रतिसाद मिळाला नाही. मात्र आता कुली नंबर १ चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, हे पहावे लागेल. 

मुंबई मिररने दिलेल्या वृत्तात, संवाद लेखक फरहाद सामजी यांनी सांगितले होते की, ‘वरूणसारख्या अभिनेत्यासोबत काम करणे कुठल्याही लेखकासाठी अभिमानाची गोष्ट आहे. मी नुकतेच त्याला संवाद ऐकवले आणि त्याने लगेच रिहर्सलसाठी या संवादाची एक कॉपी मागवून घेतली. ‘कुली नंबर १’ सुरु व्हायला वेळ आहे. पण वरूण त्यासाठी रिहर्सल करू इच्छितो. मी सारासोबत दुसऱ्यांदा काम करण्यासही उत्सूक आहे.’ 


वरूण आणि साराचे चाहते त्या दोघांची केमिस्ट्री रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी खूप उत्सुक आहेत.

Web Title: Varun Dhawan and Sara Ali Khan share photo and announce release date of Coolie no. 1 remake