वरुण धवन-जान्हवीच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'मधील किसींग सीन्सवर सेन्सॉरची कात्री
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 16:40 IST2025-09-30T16:36:41+5:302025-09-30T16:40:23+5:30
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमा पास करण्याआधी सेन्सॉर बोर्डाने काही सूचना दिल्या आहेत.

वरुण धवन-जान्हवीच्या 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'मधील किसींग सीन्सवर सेन्सॉरची कात्री
वरुण धवन आणि जान्हवी कपूरचा आगामी सिनेमा 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' २ ऑक्टोबर रोजी रिलीज होत आहे. यामध्ये रोहित सराफ आणि सान्या मल्होत्राचीही भूमिका आहे. रोमँटिक कॉमेडी जॉनरचा हा सिनेमा आहे. दरम्यान सिनेमातील काही सीन्सवर सेन्सॉर बोर्डाने कात्री चालवली आहे. यातील ६० टक्के किसींग सीन कट करण्यात आले आहेत. यानंतरच सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट देऊन पास केलं आहे.
बॉलिवूड हंगामा रिपोर्टनुसार, 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमा पास करण्याआधी सेन्सॉर बोर्डाने काही सूचना दिल्या आहेत. एका सीनमध्ये वरुण धवन त्याच्या सहकलाकाराला शिव्या देतो तेव्हा 'गार्ड' हा शब्द म्यूट करायला सांगितला आहे. तर दुसरी सूचना म्हणजे सिनेमातील लिपलॉक सीन्स ६० टक्क्यांनी कमी करायला सांगितले आहेत. यासोबतच मेकर्सला ड्रिंकिंग सीनवेळी चेतावनी देण्याचीही सूचला केली आहे. या बदलांनंतरच सिनेमाला अंतिम मंजुरी मिळाली आहे.
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' हा सिनेमा २ तास १५ मिनिटांचा आहे. 'हम्प्टी शर्मा की दुल्हनिया', 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमांचे दिग्दर्शक शशांक खेतान यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. वरुण धवन, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ आणि जान्हवी कपूर यांच्याशिवाय सिनेमात अक्षय ओबेरॉय, अभिनव शर्मा, मनीष पॉलही दिसणार आहेत. करण जोहरच्या 'धर्मा प्रोडक्शन'अंतर्गत सिनेमाची निर्मिती झाली आहे.