सलमान खानचा सह-कलाकार आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डरचे निधन, शस्त्रक्रियेदरम्यान आला हृदयविकाराचा झटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 09:03 IST2025-10-10T09:02:46+5:302025-10-10T09:03:47+5:30
मनोरंजन आणि बॉडीबिल्डिंग विश्वाला मोठा धक्का बसला आहे.

सलमान खानचा सह-कलाकार आणि प्रसिद्ध बॉडीबिल्डरचे निधन, शस्त्रक्रियेदरम्यान आला हृदयविकाराचा झटका
Varinder Singh Ghuman Death: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या 'टायगर ३' चित्रपटात दिसलेला प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि व्यावसायिक बॉडीबिल्डर वरिंदर सिंग घुमानचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. तो अवघ्या ४१ वर्षांचा होता. त्यांच्या अकाली निधनाने मनोरंजन आणि बॉडीबिल्डिंग विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वरिंदर सिंग घुमान हा अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात बायसेप्सच्या किरकोळ शस्त्रक्रियेसाठी गेला होता. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यावर त्याला त्याच दिवशी घरी परतण्याची अपेक्षा होती. मात्र, दुर्दैवाने शस्त्रक्रियेदरम्यान त्याला हृदयविकाराचा झटका आला, ज्यामुळे त्याचे निधन झाले.
पंजाबच्या गुरुदासपूर येथील रहिवासी असलेला वरिंदर सिंग घुमानचे बॉडीबिल्डिंग क्षेत्रात एक मोठं नाव होतं. त्यानं २००९ मध्ये मिस्टर इंडियाचा किताब जिंकला होता आणि मिस्टर एशियामध्ये दुसरे स्थान पटकावलं होतं. तो जगातील पहिला शाकाहारी व्यावसायिक बॉडीबिल्डर म्हणूनही ओळखला जातो.
बॉडीबिल्डिंगसह चित्रपटसृष्टीही गाजवली
वरिंदर घुमाननं बॉडीबिल्डिंग क्षेत्रासोबतच पंजाबी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतही स्वतःची ओळख निर्माण केली होती. त्यानं २०१२ मध्ये 'कबड्डी वन्स अगेन' मध्ये मुख्य भूमिका साकारली. याशिवाय, तो 'रोअर: टायगर्स ऑफ द सुंदरबन्स' (२०१४) आणि 'मरजावां' (२०१९) मध्येही दिसला होता. नुकताच तो सलमान खानच्या 'टायगर ३' मध्ये दिसला होता. पंजाबचे उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा यांनी वरिंदर घुमान यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले असून, त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, अशा भावना व्यक्त केल्या आहेत.
ਪੰਜਾਬ ਦੇ ਮਸ਼ਹੂਰ ਬਾਡੀਬਿਲਡਰ ਤੇ ਅਦਾਕਾਰ ਵਰਿੰਦਰ ਸਿੰਘ ਘੁੰਮਣ ਜੀ ਦੇ ਅਚਾਨਕ ਦੇਹਾਂਤ ਦੀ ਖ਼ਬਰ ਸੁਣ ਕੇ ਦਿਲ ਬਹੁਤ ਦੁਖੀ ਹੈ।
— Sukhjinder Singh Randhawa (@Sukhjinder_INC) October 9, 2025
ਉਹਨਾਂ ਨੇ ਆਪਣੀ ਸਖ਼ਤ ਮਿਹਨਤ, ਅਨੁਸ਼ਾਸਨ ਤੇ ਕਾਬਲੀਅਤ ਨਾਲ ਪੰਜਾਬ ਦਾ ਨਾਮ ਦੁਨੀਆ ਭਰ ‘ਚ ਰੌਸ਼ਨ ਕੀਤਾ।
ਵਾਹਿਗੁਰੂ ਜੀ ਉਹਨਾਂ ਦੀ ਆਤਮਾ ਨੂੰ ਚਰਣਾਂ ਵਿੱਚ ਨਿਵਾਸ ਬਖ਼ਸ਼ਣ ਤੇ ਪਰਿਵਾਰ ਨੂੰ ਇਹ ਦੁਖਦਾਇਕ ਭਾਣਾ… pic.twitter.com/ZVQHUNWVf6
मित्राच्या निधनाची पोस्ट ठरली शेवटची
प्रसिद्ध पंजाबी अभिनेता आणि गायक राजवीर जवांदा याचं बुधवारी मोहालीतील खासगी रुग्णालयात निधन झालं. तो अवघ्या ३५ वर्षांचा होता. शिमल्याला जाताना त्याच्या बाईकचा भीषण अपघात झाला होता. त्यानंतर त्याला मोहाली इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अपघातात जखमी झालेल्या राजवीवर अनेक दिवस उपचार सुरू होते. पण त्याची प्रकृती खालवत गेली आणि त्याचे निधन झाले. राजवीर हा वरिंदरचा चांगला मित्र होता. वरिंदरने राजवीरच्या श्रद्धांजलीची पोस्ट केली होती. हीच त्याची शेवटची पोस्ट ठरली. या पोस्टनंतर थेट वरिंदरच्या निधनाची बातमी आली.