​वाणी कपूरकडे नाहीत ‘या’ गोष्टीसाठी पैसे!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 15:21 IST2016-12-06T15:21:14+5:302016-12-06T15:21:14+5:30

‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये दिसलेली वाणी कपूर आणि ‘बेफिक्रे’मध्ये दिसतेयं, ती वाणी यांच्यात तुम्हाला काही फरक जाणवतोय का? सध्या सोशल ...

Vani Kapoor does not have money for 'this' thing !! | ​वाणी कपूरकडे नाहीत ‘या’ गोष्टीसाठी पैसे!!

​वाणी कपूरकडे नाहीत ‘या’ गोष्टीसाठी पैसे!!

ुद्ध देसी रोमान्स’मध्ये दिसलेली वाणी कपूर आणि ‘बेफिक्रे’मध्ये दिसतेयं, ती वाणी यांच्यात तुम्हाला काही फरक जाणवतोय का? सध्या सोशल मीडियावर यावर जोरदार चर्चा सुरु आहे. ‘बेफिक्रे’मध्ये वाणी कपूर बिनधास्त आणि बोल्ड अंदाजात दिसणार आहे.वाणीच्या या बोल्ड आणि बिनधास्त अंदाजासोबतच तिच्या बदललेल्या लूकचीही सध्या बरीच चर्चा सुरु आहे.

 



वाणीने लीप आणि जॉ लाईन सर्जरी केल्याचे बोलले जातेय शिवाय वाणीच्या या बदललेल्या लूकवर अनेक जोक्स होऊ लागले आहेत. सोशल मीडियावर अनेक जण वाणीची टर उडवताना दिसत आहे. 
खरे तर वाणीने आधी हे सगळे विनोद खिलाडूवृत्तीने घेतले. पण  पाणी डोक्याच्या वर जाते म्हटल्यावर मात्र तिने यावर खुलसा दिला आहे. सोशल मीडियावरचे ‘खूबसूरत वाणी बदल गईं हैंडसम वाना’ असे कमेंन्ट जिव्हारी लागल्याने कदाचित वाणीने यावर खुलासा दिलाय. मी माझ्या चेहºयावर काही केले, असे वाटतेय. यावर काय बोलावे, काय नाही, मला ठाऊक नाही. मी माझे वजन घटवलेयं. याचमुळे माझा चेहरा बदललेला दिसतोय. चित्रपटाच्या शूटींगदरम्यान वेगवेगळ्या अँगलने शॉट घेतले जातात. कदाचित त्यामुळे माझा चेहरा बदलेला दिसत असावा. सर्जरी करण्याइतके पैसे माझ्याजवळ नाहीत. मी केवळ एक चित्रपट जुनी आहे, असे वाणीने म्हटले आहे.





‘बेफिक्रे’आधी वाणी ‘शुद्ध देसी रोमान्स’मध्ये दिसली होती. यात परिणीती चोप्रा आणि सुशांत सिंह राजपूत लीड रोलमध्ये होते. या चित्रपटात वाणी अतिशय सुंदर दिसली होती. तिच्या लूकची लोकांनी बरीच प्रशंसा केली होती. पण ‘बेफिक्रे’मधील वाणीच्या लूकची खिल्ली उडवली जातेय.
 

Web Title: Vani Kapoor does not have money for 'this' thing !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.