वाणी कपूरने या कारणामुळे 'बेल-बॉटम'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 03:06 PM2021-08-03T15:06:07+5:302021-08-03T15:06:27+5:30

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूर लवकरच बेल बॉटम चित्रपटात दिसणार आहे.

Vani Kapoor agreed to work in 'Bell-Bottom' for this reason | वाणी कपूरने या कारणामुळे 'बेल-बॉटम'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

वाणी कपूरने या कारणामुळे 'बेल-बॉटम'मध्ये काम करण्यासाठी दिला होकार

googlenewsNext

बॉलिवूड अभिनेत्री वाणी कपूरला आनंद झाला आहे की, तिला चित्रपट 'बेल-बॉटम'मध्‍ये अक्षय कुमारसोबत काम करण्‍याची संधी मिळाली. या चित्रपटामध्‍ये तिची लहान, पण प्रभावी भूमिका आहे. वानी म्‍हणते की तिने चित्रपटामध्‍ये काम करण्‍यासाठी त्‍वरित होकार दिला, कारण तिला तिच्‍या मार्गदर्शक आयडॉलसोबत काम करण्‍याची संधी मिळाली. 

वाणी म्‍हणते, ''हिंदी चित्रपटसृष्‍टीमधील आजच्‍या आयकॉन्‍सपैकी एक अक्षय कुमार सरांसोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याने मी स्‍वत:ला नशीबवान मानते. ती त्‍यांच्या विश्‍वासाचे मनापासून आभार मानते. माझी 'बेल-बॉटम' चित्रपटामध्‍ये लहान, पण प्रभावी भूमिका आहे, जी प्रेक्षक व समीक्षकांमध्‍ये लोकप्रिय ठरेल अशी मी आशा व्‍यक्‍त करते.'' 


ती पुढे म्‍हणते, ''मला आनंद होत आहे की, चित्रपटसृष्‍टीमधील माझ्या आतापर्यंतच्‍या प्रवासाने मला चित्रपटाचा भाग होण्‍यास सक्षम केले आहे आणि ती अक्षय कुमार सरांसोबत काम करू शकले, जे सुपरस्‍टार असण्‍यासोबत उत्तम व्‍यक्‍ती देखील आहे. ज्‍यामुळे या चित्रपटासाठी काम करण्‍याबाबत निर्णय घेताना कोणताच किंतु मनात आला नाही.'' 


वाणीने गुपित सांगितले की, तिचे वडील शिव कपूर अक्षय कुमारचे मोठे चाहते आहेत आणि वानीला त्‍यांच्‍यासोबत मोठ्या चित्रपटामध्‍ये काम करण्‍याची संधी मिळाल्‍याचे समजल्‍यानंतर त्‍यांना खूप आनंद झाला. ती म्‍हणते, ''मला सांगावेसे वाटते की, माझे वडिल अक्षय कुमारचे मोठे चाहते आहेत आणि मला त्‍यांच्‍यासोबत काम करण्‍याची संधी मिळाल्‍याचे समजल्‍यानंतर त्‍यांना खूप आनंद झाला. त्‍यांना ज्‍या कलाकाराचा अभिनय आवडतो अशा या मेगास्‍टारसोबत मी काम करत असल्‍याचा त्‍यांच्‍या चेहऱ्यावरील आनंद खूपच अद्भुत होता. मी त्‍यांना याबाबत सांगितले तेव्‍हा त्‍यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.''   


वाणी म्‍हणते, ''या कारणांसाठी 'बेल-बॉटम' हा माझ्यासाठी आतापर्यंतचा अत्‍यंत संस्‍रमणीय चित्रपट आहे. मी आशा करते की, जगभरातील प्रेक्षकांना हा चित्रपट आवडेल.'' ती चित्रपट 'चंदिगड करे आशिकी'मध्‍ये आयुष्मान खुराणासोबत आणि चित्रपट 'शमशेरा'मध्‍ये रणबीर कपूरसोबत देखील दिसणार आहे.

Web Title: Vani Kapoor agreed to work in 'Bell-Bottom' for this reason

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.