Valentine Day : अनिता-रोहित जोडीचा येणार खास म्युझिक व्हिडीओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 17:04 IST2019-02-06T16:55:19+5:302019-02-06T17:04:31+5:30

व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अनिता हसनंदानी आणि पती रोहित रेड्डी एक खास म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी सज्ज झाले आहेत

Valentine Day: Anita-Rohit's special music video will come | Valentine Day : अनिता-रोहित जोडीचा येणार खास म्युझिक व्हिडीओ

Valentine Day : अनिता-रोहित जोडीचा येणार खास म्युझिक व्हिडीओ

ठळक मुद्देव्हिडीओनिमित्त प्रथमच ते दोघे पडद्यावर एकत्र काम करत आहे

व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त अनिता हसनंदानी आणि पती रोहित रेड्डी एक खास म्युझिक व्हिडीओ शूट करण्यासाठी सज्ज झाले आहेत. राहत फतेह अली खान यांनी गायलेल्या या गाण्याच्या व्हिडीओनिमित्त प्रथमच ते दोघे पडद्यावर एकत्र काम करत आहे. 'हे रोमँटिक गाणे असून मी ते जितक्या वेळेला ऐकते तितक्या वेळेला रोमांच उभे राहते. माझ्या मनात काहीशी भीतीही वाटत आहे. लोकांना हे गाणे आणि आमच्यातील केमिस्ट्री आवडेल अशी आशा आहे. अर्थात फोटोज बघून आमच्या केमिस्ट्रीचे कायम कौतुकच झाले आहे' असे अनिता सांगते. व्यावसायिक दृष्ट्या पहिल्यांदाच असे एकत्र काम करत असल्याने उत्सुक असल्याचे सांगायला ती विसरत नाही.

व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त काय करणार असे अनिताला विचारल्यावर ती सांगते, 'आम्ही श्रीलंकेला जातोय. मी एकदम टिपिकल मुलगी असल्याने व्हॅलेंटाइन्स डेला मला फुले, चॉकलेट्स आणि गिफ्ट्स आवडतात. आम्ही जेव्हा डेट करायचो तेव्हाही एकमेकांना वेळ देणे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचे होते. रोहितला ही हे खूप भावते. तो मला खूप सरप्राईज देत असतो. व्हॅलेंटाइन्स डेला आम्ही एकमेकांसाठी नेहमीच काही तरी खास करतो. त्यातच आम्हाला खूप मजा येते'.

अनिताच्या लेखी प्रेमाची व्याख्या काय आहे माहितेय? तिच्यानुसारही, 'प्यार दोस्ती है. हे उत्तर कितीही जुने असले तरी माझा या संकल्पनेवर पूर्ण विश्वास आहे. माझे माझ्या नवऱ्यासोबत खूप सुंदर असे मैत्रीचे नाते आहे. आम्ही बेस्ट फ्रेंड्स असल्याने कुठल्याही विषयाबाबत एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलू शकतो. आम्हाला एकमेकांचा सहवास प्रिय आहे. नात्यात विश्वास आणि सच्चेपणासह हे ही तितकेच महत्त्वाचे असल्याचे मला वाटते. आम्हाला एकमेकांची एखादी गोष्ट आवडली नसेल तर त्याविषयी आम्ही बिनदिक्कत समोरच्याला सांगू शकतो किंबहुना चर्चेतून उद्भवलेला प्रश्न सोडवतो'.

Web Title: Valentine Day: Anita-Rohit's special music video will come