Video - "बेबी, I Love You"; व्हॅलेंटाईन डेनिमित्त शहनाजचं नवं गाणं, फॅन्सना सिडनाजची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 14:44 IST2024-02-14T14:40:12+5:302024-02-14T14:44:55+5:30

Shehnaaz Gill : बिग बॉस फेम शहनाज गिलच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या स्पेशल पोस्टने चाहत्यांना पुन्हा एकदा 'सिडनाज'ची आठवण करून दिली आहे.

valentine day 2024 Shehnaaz Gill song baby i love you make remember fans sidharth shukla | Video - "बेबी, I Love You"; व्हॅलेंटाईन डेनिमित्त शहनाजचं नवं गाणं, फॅन्सना सिडनाजची आठवण

Video - "बेबी, I Love You"; व्हॅलेंटाईन डेनिमित्त शहनाजचं नवं गाणं, फॅन्सना सिडनाजची आठवण

जगभरात प्रेमाचा दिवस म्हणजेच व्हॅलेंटाईन डे साजरा केला जात आहे. प्रत्येकजण आपल्या पद्धतीने तो साजरा करतं. याच दरम्यान बिग बॉस फेम शहनाज गिलच्या एका पोस्टने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तिच्या या स्पेशल पोस्टने चाहत्यांना पुन्हा एकदा 'सिडनाज'ची आठवण करून दिली आहे. व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने शहनाज गिलचं एक गाणं आलं आहे. 

शहनाज गिलने आपल्या कॅप्शनमध्ये "Baby i love u ❤️ Do you love me too ??" असं म्हटलं आहे. शहनाजची ही पोस्ट सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचवेळी, 'सिडनाझ'च्या चाहत्यांना ही पोस्ट सिद्धार्थ शुक्लासाठी असल्याचं वाटत आहे. तिच्या हृदयात नेहमीच सिद्धार्थ असल्याचं देखील म्हटलं आहे. 

पंजाबी सिंगर आणि अभिनेत्री शहनाज गिलला बिग बॉस 13 मधून खूप प्रसिद्धी मिळाली. या रिॲलिटी शो दरम्यान शहनाज आणि सिद्धार्थची बॉन्डिंग प्रेक्षकांना आवडली आणि त्यांना सिडनाज हा टॅग देण्यात आला. सिद्धार्थ आता या जगात नसला तरी त्याच्या असंख्य आठवणी आहेत. 

शहनाजने 'किसी का भाई किसी की जान' आणि 'थँक्यू फॉर कमिंग' या दोन बॉलिवूड चित्रपटात काम केलं आहेत. याशिवाय ती अनेक म्युझिक व्हिडिओंमध्येही दिसली आहे. शहनाज सोशल मीडियावरही खूप सक्रिय असते. ती नेहमीच तिचे ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. 
 

Web Title: valentine day 2024 Shehnaaz Gill song baby i love you make remember fans sidharth shukla