युवी-हेजलची लगीनघाई...मोदींना दिले निमंत्रण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2016 15:30 IST2016-11-24T15:30:00+5:302016-11-24T15:30:00+5:30
भारतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल कीच या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. येत्या ३० नोव्हेंबरला ...

युवी-हेजलची लगीनघाई...मोदींना दिले निमंत्रण!!
भ रतीय क्रिकेटपटू युवराज सिंह आणि अभिनेत्री हेजल कीच या दोघांच्या लग्नाची सध्या जोरदार तयारी सुरु आहे. येत्या ३० नोव्हेंबरला युवराज व हेजल लग्नबंधनात अडकणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही या लग्नाचे निमंत्रण देण्यात आले आहे. युवराजने आई शबनम सिंह हिच्यासोबत पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून त्यांना विवाहाचे निमंत्रण दिले. गुरुवारी सकाळी युवराज व शबनम संसदेत पोहोचले. येथे पंतप्रधानांसह काही मंत्री व खासदारांना युवराजने जातीने लग्नाचे निमंत्रण दिले.
![Yuvraj Singh and Hazel Keech]()
क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर युवराज व हेजलच्या लग्नाची निमंत्रण पत्रिका डिझाईन करण्यात आहे. प्रीमिअर लीग या स्पेशल नावाने तयार करण्यात आलेली ही निमंत्रण पत्रिका एकदम हटके आहे. युवराज व हेजलचे कार्टून आणि इलस्ट्रेशनचा वापर करून ती डिझाईन करण्यात आली आहे. पत्रिकेच्या प्रत्येक पानावर युवराज व हेजलची इलेस्ट्रेशन्स आहेत.
![]()
येत्या ३० नोव्हेंबरला चंदीगडला पंजाबी पद्धतीने युवराज व हेजल यांचा भव्य विवाह सोहळा होणार आहे. यानंतर २ डिसेंबरला गोव्यात हिंदू रिती-रिवाजाने युवराज व हेजल पुन्हा एकदा विवाह बंधनात अडकणार आहेत. ५ डिसेंबरला दिल्लीस्थित छत्तरपूरच्या फार्म हाऊसवर ग्रँड रिसेप्शन होणार आहे. या रिसेप्शनमध्ये बॉलिवूड व राजकारणातील दिग्गज सहभागी होण्याचा अंदाज आहे.
![]()
यावर्षीच्या प्रारंभी युवराज व हेजल यांचा साखरपुडा झाला होता. युवराजने सोशल मीडियावरून ही बातमी चाहत्यांशी शेअर केली होती. सध्या युवराज टीम इंडियामध्ये नाही. यावर्षी मार्चमध्ये युवराज आॅस्ट्रेलियाविरूद्ध टी-२० मॅच खेळताना अखेरचा दिसला होता. डिसेंबर २०१३ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरूद्ध तो शेवटचा वन-डे खेळला होता.