युुलिया वंतुरला भारतीय संस्कृती वाटते फारच वेगळी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 22:21 IST2016-11-26T22:21:37+5:302016-11-26T22:21:37+5:30
बॉलिवूडचा ‘दंबग खान’ सलमाची कथित प्रियसी युुलिया वंतुर भारतात परतली आहे. सलमानची सावत्र आई हेलन यांच्या वाढदिवसाला युुलिया वंतुर ...

युुलिया वंतुरला भारतीय संस्कृती वाटते फारच वेगळी
ब लिवूडचा ‘दंबग खान’ सलमाची कथित प्रियसी युुलिया वंतुर भारतात परतली आहे. सलमानची सावत्र आई हेलन यांच्या वाढदिवसाला युुलिया वंतुर हजर राहणार असेल. याच दरम्यान तिने भारतीय संस्कृतीवर आपले मत व्यक्त करताना येथील संस्कृती फारच वेळी असल्याचे सांगितले आहे.
युुलिया वंतुरने एका रोमानियन संकेत स्थळाला दिलेल्या मुलाखतीमध्ये तिने अप्रत्यक्षरित्या सलमानसोबतच्या संबंधांवरही भाष्य केले आहे. मात्र यासाठी तिने हेलन यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधले आहे. बरेच दिवसापासून आपण आपल्या कु टुंबापासून दूर असल्याने मी त्यांना भेटायला गेली होती असे तिने सांगितले. दरम्यान माझा भारतातील व्हिसा संपल्यामुळे मला नुतनीकरणासाठी रोमानियात परत जावे लागले होते. माझ्या आगामी प्रोजेक्टसाठी मी आता मुंबईत परत आली आहे, असे ती म्हणाली.
युुलिया म्हणाली, सध्या मी हिंदी गाणे शिकत आहे. मी यासाठी खूप मेहनत घेत आहे. बॉलिवूडमध्ये मी काम करीत आहे पण, येथे कामाबद्दल बोलण्यापेक्षा इथे लोक माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दलच अधिक बोलतात. मी पाच ते सहा महिने भारतात होते, तेव्हा मला अनेक गोष्टी कळल्या, ज्या मला इथे सांगायच्या नाहीत. भारतीयांची मानसिकता ही पूर्णपणे वेगळी आहे. इथली संस्कृती, इथले लोक सगळंच वेगळं आहे. इथे तुम्हाला फार एकांत मिळत नाही. कारण एकाच घरात खूप लोकं राहतात. याशिवाय इथे विचारपूर्वक कपडे वापरावे लागतात. असेही युुलिया हिने सांगितले.
सलमान खान आणि युुलिया वंतुर हे दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे सांगण्यात येते. खान कुटुंबीयांच्या अनेक कार्यक्रमात तिची उपस्थिती बरेच काही सांगून जाते. सलमान व युुलियाबद्दल अनेक बातम्या मीडियात चर्चेला येत असल्या तरी काही दिवसांपूर्वी सलमानने युुलिया केवळ माझी चांगली मैत्रीण असल्याचे सांगितले होते.