मलायकाच्या फिटनेसची झाली पोलखोल,पोटावरील स्ट्रेचमार्कमुळे झाली जबरदस्त ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 16:29 IST2021-02-08T16:17:40+5:302021-02-08T16:29:47+5:30

वर्कआऊट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मलायकाने मीडियाचे कॅमेरे पाहून पोज वर पोज द्यायला सुरुवात केली आणि तिथेच ती फसली.

users trolled Malaika Arora for her visible stretch marks, See Pics | मलायकाच्या फिटनेसची झाली पोलखोल,पोटावरील स्ट्रेचमार्कमुळे झाली जबरदस्त ट्रोल

मलायकाच्या फिटनेसची झाली पोलखोल,पोटावरील स्ट्रेचमार्कमुळे झाली जबरदस्त ट्रोल

मलायकाचे फिटनेस प्रेम पाहून भल्या भल्यांची बोलती बंद नाही झाली तरच नवल. 47 वर्षांच्या  वयातही स्वत:ला खूप चांगले फिट ठेवले आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा बिकिनी अवतार तिने शेअर केला होता तिचा हा बोल्ड अंदाज चाहत्यांना कमालीचा आवडला असून काहीच तासांत या फोटोंना हजारो लाईक्स मिळाले आहेत.

 

तुर्तास याच फोटोमुळे ती ट्रोलही होत आहे. वर्कआऊट झाल्यानंतर नेहमीप्रमाणे मलायकाने मीडियाचे कॅमेरे पाहून पोज वर पोज द्यायला सुरुवात केली आणि तिथेच ती फसली. 

झाले असे की, मलायकाने यावेळी परिधान केलेल्या ट्रॅक पँट आणि गुलाबी रंगाच्या टॉपनेच तिला दगा दिला. नेहमीच मलायका तिचे पोट दिसणार नाही असेच कपडे घालते. मात्र यावेळी तिने घातलेल्या ड्रेसिंगमुळे तिचे पोट दिसत होते. यावरुनच तिच्या पोटावर असलेले स्ट्रंचमार्कही ठळक कॅमे-यात कॅप्चर झाले. हे फोटो सोशल मीडियावर येताच तिच्या चाहत्यांनी अतिशय बारिक लक्ष देत तिच्या स्ट्रेचमार्कवरच लक्ष केंद्रित केले.

 

स्ट्रेचमार्क दिसत असल्यामुळे मलायकाची पुन्हा एकदा चाहते खिल्ली उडवू लागले. एका युजरने तर तू आता खरंच म्हातारी झालीयस, तर दुस-या एका युजरने ओल्ड आन्टी, प्लास्टिक की दुकान अशा काहीही विचित्र कमेंट करत तिची थट्टा करत असल्याचे पाहायला मिळतंय, तर दुसरीकडे असेही काही युजर आहेत. ज्यांनी मलायकाची बाजु घेत ट्रोल करणा-यांची बोलती बंद केली आहे. 

मुंबई स्टेशनवरचा तो फोटो पाहून भावूक झालेत मलायका अरोरा-अर्जुन कपूर, म्हणाले...


लोकलमध्ये चढण्याआधी एका प्रवाश्याने चक्क लोकलच्या दारावर डोकं ठेवून नमस्कार केला. कोणीतरी हा फोटो कॅमेरात कैद केला आणि त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला. या फोटोने अनेकांनी मने जिंकलीत. बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व मलायका अरोरा त्यापैकीच एक.मुंबईच्या चाकरमान्याचा हा फोटो पाहून मलायका व अर्जुन दोघेही भावूक झालेत. दोघांनीही वेगवेगळ्या कॅप्शनसह आपल्या सोशल अकाऊंटवर हा फोटो शेअर केला.हा फोटो माझ्या मनाला स्पर्शून गेला. मी तुझ्या भावना समजू शकते भावा, असे लिहित मलायकाने हा फोटो शेअर केला.

Web Title: users trolled Malaika Arora for her visible stretch marks, See Pics