​‘काबील’मध्ये उर्वर्शीचा हॉट आयटम नंबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 16:14 IST2016-11-27T15:18:02+5:302016-12-01T16:14:58+5:30

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हृतिक रोशनच्या आगामी ‘काबील’ या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसणार आहे. या गाण्याचे शूटींग ...

Urvashi's hot item number in 'Qabil' | ​‘काबील’मध्ये उर्वर्शीचा हॉट आयटम नंबर

​‘काबील’मध्ये उर्वर्शीचा हॉट आयटम नंबर

लिवूडची हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हृतिक रोशनच्या आगामी ‘काबील’ या चित्रपटात आयटम नंबर करताना दिसणार आहे. या गाण्याचे शूटींग नुकतेच पूर्ण करण्यात आले. या शूटींगदरम्यानचे काही फोटो तिने  सोशल नेटवर्किंग साईटवर शेअर केले आहेत. 

राकेश रोशन यांच्या बॅनरखाली तयार होत असलेल्या  दिग्दर्शन संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’मध्ये हृतिक रोशन व यामी गौतम यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट गंभीर विषयावर आधारित असल्याने यात काही ‘सेन्सेशनल’असावे, असा संजय गुप्तांचा प्रयत्न होता.  त्यामुळेच ‘काबील’मध्ये एका आयटम नंबरचा समावेश करण्यात आला आहे. या आयटम नंबरमध्ये उर्वशी थिरकताना दिसणार आहे.

Urvashi Rautela an item number in hrithik roshan

उर्वशीने  या ‘हॉट ’आयटम नंबरच्या शूटिंगचे काही ‘हॉट ’ फोटो  शिवाय हृतिकसोबतचा एक सेल्फी शेअर केला आहे.  मी हृतिक रोशनची मोठी फॅन आहे,असे तिने म्हटले आहे.  या फोटोमधील उर्वशीचा हॉट अंदाज डोळ्यात भरणारा आहे. या गाण्यासाठी उर्वशीने गोल्डन, रेड आणि ब्लॅक रंगाचा कॉस्च्युम वापरला आहे. अमिताभ बच्चन यांच्या ‘याराना’ या चित्रपटातील ‘सारा जमाना हसीनो का दिवाना’ या गाण्यावर ती डान्स करताना दिसणार आहे. 

Urvashi Rautela an item number in hrithik roshan

या चित्रपटात आयटम नंबरसाठी उर्वशीआधी प्रियांका चोप्रा, कॅटरिना कैफ व सन्नी लिओनी यांना विचारणा करण्यात आली होती. यात कुठेही उर्वशीच्या नावाची चर्चा नव्हती. पण अचानक उर्वशीची वर्णी लागली. साहजिकच हृतिकच्या चित्रपटात आयटम नंबरची संधी तिला मिळाल्याने सध्या उर्वशी जाम आनंदात आहे. 
 

Web Title: Urvashi's hot item number in 'Qabil'