वयाने दुप्पट असलेल्या ‘या’ हॉट अभिनेत्यासोबत उर्वशी रौतेलाला करायचे लग्न; जाहीरपणे केला खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2018 20:57 IST2018-04-04T15:27:32+5:302018-04-04T20:57:44+5:30
‘हेट स्टोरी-४’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला आता लग्नाचे स्वप्न पडत आहे. विशेष ...

वयाने दुप्पट असलेल्या ‘या’ हॉट अभिनेत्यासोबत उर्वशी रौतेलाला करायचे लग्न; जाहीरपणे केला खुलासा!
‘ ेट स्टोरी-४’मध्ये आपल्या बोल्ड अदांनी प्रेक्षकांना घायाळ करणारी हॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला हिला आता लग्नाचे स्वप्न पडत आहे. विशेष म्हणजे ती स्वत:हूनच याबाबतचा जाहीरपणे खुलासा करीत आहे. नुकतीच तिने तिच्या मनातील एक गोष्ट सर्वांसमोर मान्य केली. त्यामुळे उर्वशी सध्या प्रसिद्धीच्या झोतात आली आहे. या मुलाखतीत तिला विचारण्यात आले की, ती सलमान खानची चाहती आहे काय? त्यावर तिने म्हटले की, मी सलमानची खूप मोठी चाहती आहे. केवळ चाहतीच नाही तर मला त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा आहे.
खरं तर सलमान खान चित्रपटांबरोबरच लग्नावरूनही चर्चेत असतो. सध्या सलमानचे वय ५२ वर्ष इतके आहे. परंतु अशातही तो अविवाहित जीवन जगत आहे. तो लग्न का करीत नाही? हा एक खूप मोठा प्रश्न असून, सातत्याने यावर चर्चा रंगत आली आहे. विशेष म्हणजे अजूनही सलमानसोबत लग्न करण्यासाठी तरुणी एका पायावर तयार आहेत. केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील तरुणी सलमानवर फिदा आहेत. अनेकांनी तर त्याच्याशी लग्न करण्याची इच्छा जाहीरपणे बोलूनही दाखविली आहे.
![]()
आता या यादीत २५ वर्षीय उर्वशी रौतेलाचे नाव जोडले गेले आहे. विशेष म्हणजे सलमान आणि उर्वशीच्या वयात खूप अंतर आहे. उर्वशीच्या तुलनेत सलमानचे वय दुप्पट आहे. परंतु अशातही उर्वशी त्याच्याशी लग्न करण्यास एका पायावर तयार आहे. दरम्यान, उर्वशीने या मुलाखतीत हादेखील खुलासा केला की, ती सध्या तिच्या करिअरवरच अधिक फोकस करीत आहे.