उर्वशी रौतेला इन्फ्लुएन्सरसोबत लग्न करतेय? फोटोवरील कमेंट चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 10:40 IST2025-02-24T10:40:11+5:302025-02-24T10:40:33+5:30
उर्वशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

उर्वशी रौतेला इन्फ्लुएन्सरसोबत लग्न करतेय? फोटोवरील कमेंट चर्चेत
बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) ही एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. उर्वशी तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. ती अनेकदा कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. डाकू महाराजमधील नंदमुरी बालकृष्णासोबतचा डान्स असो किंवा सैफ अली खानच्या हल्ल्यावरील तिची असंवेदनशील टिप्पणी असो, उर्वशीला चाहत्यांचे लक्ष कसं वेधून घ्यायचं हे माहित आहे. अशातच आता उर्वशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
उर्वशीच्या डेटींग लाईफबद्दल नेहमीच अफवा उडतात. पण, आता तर थेट तिच्या लग्नाची चर्चा सुरू झाली आहे. एखादा आभिनेता किंवा क्रिकेटर नाही तर ती उर्वशी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसोबत लग्न करणार असल्याचं समोर येतंय. हा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर दुसरा तिसरा कुणी नाही तर सेलेब्सचा लाडका ओरहान अवत्रमणी उर्फ 'ओरी' (Orhan Awatramani Aka Orry) आहे. या चर्चांना खुद्द उर्वशीनेच खतपाणी घातलं आहे.
ओरी हा नुकतंच पार पडलेल्या आदर जैन आणि अलेखा यांच्या लग्नात सहभागी झाला होता. या लग्नातील स्वतःचा एक फोटो ओरीने शेअर केला. या फोटोवर कमेंट करत उर्वशीनं लिहिलं, "तुझ्या लग्नात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे". यावर ओरीने कमेंट करत लिहलं, " उर्वशी आपलं". कमेंट सेक्शनमध्ये ओरी आणि उर्वशीमधील हा संवाद पाहून चाहत्यांमध्ये लग्नाबद्दल चर्चा सुरू झाली आहे. ओरी आणि उर्वशी खरोखर लग्न करणार आहेत का? की हा फक्त एक प्रसिद्धी स्टंट आहे, असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
उर्वशीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर ती अलिकडेच 'डाकू महाराज' सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या चित्रपटात अभिनेत्रीची ३ मिनिटांची भूमिका होती. असं असूनही तिची फी जास्त असल्याचं सांगितलं जातं. चित्रपटातील मुख्य कलाकार नंदमुरी बालकृष्ण आहेत. उर्वशीने डाकू महाराज या चित्रपटातील तिच्या काही मिनिटांच्या भूमिकेसाठी ३ कोटी रुपये घेतले आहेत. उर्वशी सतत लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत असते. तिचं नाव भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंतसोबतही जोडलं गेलं होतं. तिनेच याची चर्चा उठवली होती असं नंतर समोर आलं. रिषभ पंतने सर्व चर्चांचं खंडन केलं होतं.