उदय चोप्राने मोडलं नर्गिस फाखरीसोबत ठरलेलं लग्न? लग्नाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच दिला नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 5, 2024 01:25 PM2024-01-05T13:25:44+5:302024-01-05T13:26:14+5:30

Uday chopra: काम मिळत नसल्यामुळे उदय डिप्रेशनमध्ये गेला होता. याच काळात त्याने नर्गिसची सुद्धा साथ सोडली.

Uday Chopra broke the arranged marriage with Nargis Fakhri? The actor refused even before the date of marriage was announced | उदय चोप्राने मोडलं नर्गिस फाखरीसोबत ठरलेलं लग्न? लग्नाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच दिला नकार

उदय चोप्राने मोडलं नर्गिस फाखरीसोबत ठरलेलं लग्न? लग्नाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच दिला नकार

'मोहब्बतें' या सुपरहिट ठरलेल्या सिनेमामधून कलाविश्वात पदार्पण करणारा अभिनेता म्हणजे उदय चोप्रा(uday chopra). या सिनेमानंतर उदय 'मेरे यार की शादी हैं', 'धूम' यांसारख्या अनेक सिनेमांमध्ये झळकला. हे सिनेमा बॉक्स ऑफिसवर तर हिट झाले. परंतु, उदय त्याच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांच्या मनावर चालवू शकला नाही. अनेक सिनेमांमध्ये त्याने सहकलाकाराची भूमिका मिळाली. मात्र, आतापर्यंत त्याला एकाही सिनेमात लीड रोल मिळालेला नाही. उदयचा कलाविश्वातील वावर आता कमी झाला आहे. मात्र, त्याचं वैयक्तिक आयुष्य आजही चर्चेत येतं.

इंडस्ट्रीत काम मिळत नसल्यामुळे उदय चांगलाच डिप्रेशनमध्ये गेला होता. या डिप्रेशनमुळेच त्याच्या मनात एकदा आत्महत्या करायचाही विचार आला होता. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत त्याने याविषयी भाष्य केलं होतं. या सगळ्या काळात उदय आणि अभिनेत्री नर्गिस फाखरी यांच्या रिलेशनशीपचीही जोरदार चर्चा रंगली होती. उदय आणि नर्गिसचं लग्न ठरलं होतं. मात्र, ऐनवेळी उदयने हे लग्न मोडल्याचं म्हटलं जातं.

नर्गिससोबत ठरलेलं लग्न मोडलं

उदय आणि नर्गिस फाखरी यांच्या रिलेशनशीपची त्यावेळी जोरदार चर्चा होती. या दोघांच्या नात्याविषयी त्यांच्या कुटुंबियांनाही माहित होतं. त्यामुळे त्यांनीही या जोडीच्या लग्नासाठी होकार दिला होता.  परंतु, नर्गिस त्यांच्या लग्नाची तारीख जाहीर करणार त्यापूर्वीच अचानकपणे उदयने हे लग्न मोडलं. त्याने थेट लग्न करण्यास नकार दिला. नर्गिसला या गोष्टीचा चांगलाच धक्का बसला. ज्यामुळे ती मुंबई सोडून परदेशात निघून गेली, असं म्हटलं जातं.

दरम्यान, २००६ मध्ये धूम 2 रिलीज झाल्यानंतर जवळपास ७ वर्ष उदय कोणत्याही सिनेमात दिसला नाही. त्यामुळे तो डिप्रेशनमध्ये गेला होता. त्यानंतर २०१३ मध्ये तो धूम 3 मधून पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आला. मात्र, या सिनेमामुळेही त्याला फारशी लोकप्रियता मिळाली नाही. २०१२ मध्ये उदयने योमिक ही कंपनी सुरु केली. तसंच तो यशराज फिल्म्सचा मॅनेजर सुद्धा आहे. २०१४ मध्ये त्याने 'ग्रेस ऑफ मोनाको' आणि 'द लॉन्गेस्ट वीक' या सिनेमाची निर्मिती केली.

Web Title: Uday Chopra broke the arranged marriage with Nargis Fakhri? The actor refused even before the date of marriage was announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.