आकर्ष खुराना घडवणार कॉलेज लाईफचे दर्शन, 'यू स्पेशल' वेबसीरिजची केली घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 05:21 PM2021-03-19T17:21:01+5:302021-03-19T17:21:31+5:30

'करवा'सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यावर आकर्ष खुराना आणि अधार खुराना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.

‘U-Special’ Drama Set As Lionsgate Play’s Second Original Series | आकर्ष खुराना घडवणार कॉलेज लाईफचे दर्शन, 'यू स्पेशल' वेबसीरिजची केली घोषणा

आकर्ष खुराना घडवणार कॉलेज लाईफचे दर्शन, 'यू स्पेशल' वेबसीरिजची केली घोषणा

googlenewsNext

दिग्दर्शक आकर्ष खुराना आणि अभिनेता अधार खुराना हे त्यांच्या वैविध्यपूर्ण चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहेत. अनेक सुपरहिट चित्रपट दिल्यानंतर अकर्ष खुराना आता त्यांच्या आगामी 'रश्मी रॉकेट' साठी सध्या चर्चेत आहेत. अशातच त्यांनी नवीन सिरीजची घोषणा केली आहे. या सिरीजचे नाव 'यू स्पेशल ' असे आहे .

'करवा'सारख्या चित्रपटात एकत्र काम केल्यावर आकर्ष खुराना आणि अधार खुराना ही जोडी पुन्हा एकदा एकत्र येत आहे.सुमित व्यास, तारुक रैना, अर्जुन माथुर, गोपाळ दत्त, परमब्रता चॅटर्जी, रुक्षर ढिल्लों, अहसास चन्ना आदी कलाकार या सीरिजमध्ये महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. या सीरिजमध्ये कॉलेजलाईफचे, कॉलेजवयीन मुलांचे प्रेम, त्यांचा संघर्ष, त्यांची ध्येय गाठण्याची धडपड पाहायला मिळेल. ही सिरीज या वर्षी लायन्सगेट प्ले या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होईल.   


आकर्ष खुराना दिग्दरशित रश्मि रॉकेट सिनेमात एका गावकरी तरुणीची कथा आहे, जिच्याकडे, वेगवान धावण्याची शक्ती आहे. ती एक अविश्वसनीय वेगवान धावपटू आहे आणि त्यामुळे गाववाले तिला 'रॉकेट' म्हणूनच ओळखतात. जेव्हा आपल्या प्रतिभेला व्यावसायिक रुपात साकारायची तिला संधी मिळते तेव्हा या संधीला ती वाया जाऊ देत नाही. फिनिश लाइनपर्यंत पोहोचण्याची ही शर्यत अनेक अडथळ्यांची आहे आणि एका एथलेटि प्रमाणेच ही शर्यत देखील तिच्यासाठी सन्मान, आदर आणि इतकेच नव्हे तर स्वतःला सिद्ध करण्याच्या लढाईत परावर्तित होऊन जाते. 'रश्मि रॉकेट' 2021 मध्ये प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

Web Title: ‘U-Special’ Drama Set As Lionsgate Play’s Second Original Series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.