रिलीजनंतर दोन आठवड्यांनी का वादात सापडलायं ‘डियर जिंदगी’?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2016 14:36 IST2016-12-12T14:36:30+5:302016-12-12T14:36:30+5:30
गौरी शिंदे दिग्दर्शित ‘डियर जिंदगी’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावला खरा. पण रिलीजनंतर सुमारे दोन आठवड्यांनी हा चित्रपट वादात सापडला ...

रिलीजनंतर दोन आठवड्यांनी का वादात सापडलायं ‘डियर जिंदगी’?
ग री शिंदे दिग्दर्शित ‘डियर जिंदगी’ हा चित्रपट प्रेक्षकांना भावला खरा. पण रिलीजनंतर सुमारे दोन आठवड्यांनी हा चित्रपट वादात सापडला आहे. होय, ‘डियर जिंदगी’ची कथा ही चोरीची कथा असल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी ‘डियर जिंदगी’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीसही पाठवण्यात आल्याचीही खबर आहे.
‘डियर जिंदगी’म्हणजे ‘बीर्इंग एरिका’ नामक कॅनेडियन कॉमेडी सीरिअलची कॉपी असल्याचा आरोप करण्यात येत आहे. याप्रकरणी ‘बीईंग एरिका’ बनवणाºया स्ट्रीट प्रॉडक्शनने ‘डियर जिंदगी’च्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस जारी केले आहे. अर्थात ‘डियर जिंदगी’चे सहनिर्माता असलेल्या धर्मा प्रॉडक्शनने अशी कुठलीही नोटीस मिळाल्याचा इन्कार केला आहे.
![]()
‘डियर जिंदगी’मधील अनेक सीन्स आमच्या शोमधील सीन्सशी मिळते-जुळते आहेत, असा दावा स्ट्रीट प्रॉडक्शनने केला आहे. यातील आलियाचे पात्र आमच्या शोमधील पात्राशी अगदी तंतोतंत मिळते जुळते असल्याचा दावाही या स्ट्रीट प्रॉडक्शनने केला आहे. अर्थात सूत्रांच्या मते, गौरी शिंदे आणि चित्रपटाशी संबंधित टीम सीन्स कॉपी होत असल्याबद्दल पूर्णत: अज्ञान होते. गौरी शिंदे यांनी तर हा आरोप साफ धुडकावून लावला आहे. ‘बीईंग एरिका’बद्दल मला काहीही ठाऊक नव्हते. मी या शोचे नावही ऐकलेले नव्हते.अशात यातील सीन्स कॉपी करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. ‘डिअर जिंदगी’ची कथा एकदम ओरिजनल आहे, असे गौरी शिंदे यांचे म्हणणे आहे. त्यामुळे हे प्रकरण कोर्टाबाहेर निपटण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
गत २५ नोव्हेंबरला ‘डिअर जिंदगी’ प्रदर्शित झाला होता. गत दोन आठवड्यांत या चित्रपटाने ६१ कोटी रूपयांचा बिझनेस केला.