बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी नाकारली 'भुल भूलैया'मधील मंजुलिकाची भूमिका, ही ब्युटी क्वीन होती पहिली पसंती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 04:18 PM2024-01-23T16:18:49+5:302024-01-23T16:20:02+5:30

Bhool Bhulaiya : २००७ साली रिलीज झालेला भुल भूलैया हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याचे दोन्ही भाग लोकांना खूप आवडले.

Two Bollywood actresses rejected the role of Manjulika in 'Bhul Bhulaiyya', the beauty queen was the first choice | बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी नाकारली 'भुल भूलैया'मधील मंजुलिकाची भूमिका, ही ब्युटी क्वीन होती पहिली पसंती

बॉलिवूडच्या दोन अभिनेत्रींनी नाकारली 'भुल भूलैया'मधील मंजुलिकाची भूमिका, ही ब्युटी क्वीन होती पहिली पसंती

२००७ साली रिलीज झालेला 'भुल भूलैया' (Bhool Bhulaiya) हा चित्रपट सुपरहिट ठरला आहे. त्याचे दोन्ही भाग लोकांना खूप आवडले. पण आज आम्ही त्याच्या पहिल्या भागाशी संबंधित इंटरेस्टिंग बातम्या सांगणार आहोत. विद्या बालन(Vidya Balan)च्या आधी, निर्मात्यांनी ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि राणी मुखर्जी(Rani Mukharjee)ला २००७ मध्ये आलेल्या भुल भूलैया चित्रपटातील मंजुलिकाच्या भूमिकेसाठी संपर्क साधला होता, परंतु दोघांनीही नकार दिला होता. यानंतर विद्या बालनला संधी मिळाली आणि तिने हे पात्र संस्मरणीय बनवले.

२००७ मध्ये रिलीज झालेला भुल भूलैया हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. या चित्रपटातील अक्षय कुमार आणि विद्या बालनचा अभिनय लोकांना आवडला. या चित्रपटात अक्षय कुमारने डॉ. आदित्य श्रीवास्तव यांची भूमिका साकारली होती तर विद्या बालन अवनीच्या भूमिकेत दिसली होती. अमीषा पटेल, शायनी आहुजा, परेश रावल, विक्रम गोखले, राजपाल यादव, मनोज जोशी या चित्रपटात सहाय्यक भूमिकेत होते.

'भुल भुलैया' या चित्रपटाचा आहे हिंदी रिमेक

'भुल भुलैया' हा चित्रपट मल्याळम चित्रपट मणिचित्रथाझूचा हिंदी रिमेक आहे. दिग्दर्शक प्रियदर्शन यांनी त्याचा हिंदीत रिमेक केला होता. जेव्हा चित्रपटासाठी कास्टिंग सुरू झाले तेव्हा निर्मात्यांना वाटले की ऐश्वर्या राय ही अवनी म्हणजेच मंजुलिकाची भूमिका उत्तम प्रकारे साकारू शकते. मात्र ऐश्वर्याने हा चित्रपट करण्यास नकार दिला. त्यावेळी ऐश्वर्याने झपाटलेली भूमिका करणार नसल्याचे सांगितले होते, अशी चर्चा होती. यानंतर राणी मुखर्जीला ही ऑफर आली. पण राणीनेही नकार दिला. त्यानंतर निर्मात्यांनी विद्या बालनला ही ऑफर दिली. विद्याने ही भूमिका इतक्या दमदारपणे साकारली की ती संस्मरणीय ठरली.

मंजुलिका संस्मरणीय झाली
भुल भूलैया चित्रपटात एक मनोरंजक वळण येते जेव्हा अवनी मंजुलिका बनते. या चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये विद्या बालनने दमदार अभिनय आणि डान्स केला आहे. जो आजही लोकांच्या चांगलाच लक्षात आहे. या चित्रपटाच्या जोरावर विद्या बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यात यशस्वी ठरली.

Web Title: Two Bollywood actresses rejected the role of Manjulika in 'Bhul Bhulaiyya', the beauty queen was the first choice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.