ट्विंकलच्या आईला अक्षय कुमार वाटायचा ‘समलैंगिक’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2016 10:26 IST2016-11-15T10:25:34+5:302016-11-15T10:26:18+5:30

ऐकून आश्चर्याचा धक्का बसला ना? आहो बातमीच तशी आहे. ट्विंकलची आई डिंपल कपाडियाला अक्षयकुमार ‘समलैंगिक’ वाटायचा. याचा खुलासा खुद्द ...

Twinkle's mother Akshay Kumar gets 'gay'! | ट्विंकलच्या आईला अक्षय कुमार वाटायचा ‘समलैंगिक’!

ट्विंकलच्या आईला अक्षय कुमार वाटायचा ‘समलैंगिक’!

ून आश्चर्याचा धक्का बसला ना? आहो बातमीच तशी आहे. ट्विंकलची आई डिंपल कपाडियाला अक्षयकुमार ‘समलैंगिक’ वाटायचा. याचा खुलासा खुद्द ट्विंकलनेच अक्षयसमक्ष करण जोहरच्या शोवर केला. ही गोष्ट आहे जेव्हा अक्षय डिंपलकडे ट्विंकलशी लग्न करण्याची मागणी घालायला गेला होता.

ती सांगते, ‘अक्षय आमच्या घरी आला होता. मी आणि आई सोफ्यावर बसलेलो होतो तर अक्षय माझ्या आईच्या एका मैैत्रिणीला अ‍ॅक्युप्रेशर टेक्निकचे प्रात्याक्षिक दाखवत होता. तेव्हा आई माझ्या कानात म्हणाली की, ‘तो गेल्यावर त्याच्याविषयी मला तुला काही सांगायचे आहे.’ पण मी म्हणाले की, जे सांगायचे ते आताच सांग. तेव्हा ती म्हणाली, ‘तुझा मित्र आहे ना संदीप जो पेपरमध्ये काम करतो, तो म्हणतो की अक्षय ‘गे’ आहे.

डिंपलला अक्षयबद्दल असे वाटत असल्यामुळे तिने ट्विंकलला लग्नाची घाई करण्याआगोदर अक्षयसोबत किमान एक वर्ष राहण्याचा सल्ला दिला होता. डिंपल यांना अनेक वेळा विनवण्याकरून अक्षयने ट्विंकलशी लग्न करण्याची परवानगी मिळवली होती. या शोमध्ये तिने इतर अनेक रंजक खुलासे केले. 


मां दा लाडला बिगड गया! : अक्षय कुमार, डिंपल कपाडिया आणि आमिर खान

पहिला म्हणजे, तिचे आणि अक्षयचे नाते केवळ ‘टाईमपास’ म्हणून सुरू झाले होते. लाँग रिलेशनशिपनंतर ती पुन्हा प्रेमात पडण्याच्या मन:स्थितीत नव्हती, म्हणून केवळ १५ दिवसाच्या कॅज्युएल रिलेशनशिपसाठी ती अक्षयला डेट करू लागली. पण नियतीच्या मनात वेगळेच होते आणि दोघे आजतागायत एकत्र आहेत.

महत्त्वाचे म्हणजे ‘मेला’ फ्लॉप झाल्यामुळे तिने अक्षयशी लग्न केले. ती सांगते, ‘अक्षयला लग्न करायचे होते परंतु मला वाटायचे की, ‘मेला’ सुपरहीट होईल आणि माझे करिअर जोर पकडेल. म्हणून मी लग्नाला टाळायचे. पण ‘मेल’ फ्लॉप झाला आणि मग मी लग्नास होकार दिला.’

तसेच, करण जोहरचे पहिले प्रेम म्हणजे ट्विंकल खन्ना! यावर ती मिश्किलपणे म्हणाली की, करणला मी आवडायचे कारण मला तेव्हा मिशी होती. ट्विंकलच्या अशा एका मागून एका बाउन्सरमुळे  करण आणि अक्षय दोघे आवाक होऊन पाहत राहिले.

वेल डन मिसेस फनीबोन्स!

Web Title: Twinkle's mother Akshay Kumar gets 'gay'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.