ट्विंकल खन्नानं गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, तुझं गाणं ऐकून दोन कबुतरं बेशुद्ध पडली...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2022 12:23 PM2022-01-21T12:23:40+5:302022-01-21T12:24:18+5:30

Twinkle Khanna Video : होय, ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ट्विंकलच्या समोर एका टेबलावर प्लेटमध्ये लाडू ठेवलेले आहेत आणि या लाडवांना पाहून ट्विंकल ‘मेरा दिल भी कितना पागल है,’ हे गाणं गातांना दिसतेय.

Twinkle Khanna Shares Video Of Her Singing User troll her | ट्विंकल खन्नानं गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, तुझं गाणं ऐकून दोन कबुतरं बेशुद्ध पडली...!

ट्विंकल खन्नानं गायलं गाणं; नेटकरी म्हणाले, तुझं गाणं ऐकून दोन कबुतरं बेशुद्ध पडली...!

googlenewsNext

बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार (Akshay Kumar) त्याच चित्रपटांमुळे चर्चेत असतो आणि अक्षयची पत्नी ट्विंकल खन्ना (Twinkle Khanna) तिच्या सोशल मीडियावरच्या भन्नाट पोस्टमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ट्विंकल अनेकदा पतीराजांचीही मजा घेताना दिसते. सध्याही तिच्या अशाच एका पोस्टची चर्चा आहे.
होय, ट्विंकलने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात ट्विंकलच्या समोर एका टेबलावर प्लेटमध्ये लाडू ठेवलेले आहेत आणि या लाडवांना पाहून ट्विंकल ‘मेरा दिल भी कितना पागल है,’ हे गाणं गातांना दिसतेय. या व्हिडीओला तिने दिलेलं कॅप्शनही मजेशीर आहे.

‘खाऊ की नको? हा प्रश्न तर हॅम्लेटलाही पडला नसेल, कारण त्याला कुणी कधी नाश्त्यात लाडू दिले नसतील. लाडू खाण्यापासून स्वत:ला रोखण्यासाठी मी गाणं गाऊ लागते, जेणेकरून माझं तोंड बिझी राहिलं. मी किती खराब गाते, हे मला माहितीये,’असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे.

ट्विंकलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.  यावर युजर्स एकापेक्षा एक भन्नाट कमेंट्स करत आहेत. 
‘प्लीज गाणं बंद कर आणि लाडू खा,’ असं एका युजरने तिच्या या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं. पब्लिकली असं गाणं गायला खूप हिंमत हवी, अशा शब्दांत एका युजरने तिची मजा घेतली आहे. ‘मी तुझं गाणं ब्ल्यूटूथवर वाजवलं आणि माझ्या बाल्कनीतील दोन कबूतरं बेशूद्ध पडलीत,’ अशी मजेशीर कमेंट एका युजरने केली आहे.

ट्विंकल खन्नाने ‘बरसात’ या चित्रपटाद्वारे तिच्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने बादशहा, मेला यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. राजेश खन्ना आणि डिम्पल कपाडिया यांसारख्या प्रसिद्ध कलाकारांची ट्विंकल लेक असली तरी तिला अभिनयक्षेत्रात तिचे नाव कमावता आले नाही. ती एक अभिनेत्री म्हणून कधीच चांगली नव्हती असे तीच अनेकवेळा बोलताना दिसते. अनेकवेळा तर तिच्या अभिनय कौशल्याची खिल्लीदेखील उडवते. 

Web Title: Twinkle Khanna Shares Video Of Her Singing User troll her

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.