ट्विंकल खन्नाने घेतली केजरीवालांची फिरकी, ट्वीट व्हायरल!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 21, 2019 10:43 IST2019-04-21T10:43:10+5:302019-04-21T10:43:41+5:30

अभिनेत्री ट्विंकल तिच्या फिल्मी करिअरपेक्षा बोल्ड कमेंट्ससाठी अधिक चर्चा असते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असलेली ट्विंकल बोलायची एकही संधी सोडत नाही. मग तो मुद्दा सामाजिक असो वा राजकीय. सध्या ट्विंकलने ट्वीटरवर दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेतेय.

twinkle khanna funny tweet on arvind kejriwal goes viral | ट्विंकल खन्नाने घेतली केजरीवालांची फिरकी, ट्वीट व्हायरल!!

ट्विंकल खन्नाने घेतली केजरीवालांची फिरकी, ट्वीट व्हायरल!!

ठळक मुद्देकाही दिवसांपूर्वी ट्विंकलने स्वतःचाच एक विचित्र ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.

अभिनेत्री ट्विंकल तिच्या फिल्मी करिअरपेक्षा बोल्ड कमेंट्ससाठी अधिक चर्चा असते. सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असलेली ट्विंकल बोलायची एकही संधी सोडत नाही. मग तो मुद्दा सामाजिक असो वा राजकीय. सध्या ट्विंकलने ट्वीटरवर दिलेली प्रतिक्रिया सर्वांचे लक्ष वेधून घेतेय. होय,ट्विंकलने ट्वीटरवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर फोटोतील लहान मुलगी ट्विंकलची लेक निताराचा असल्याचे कळायला वेळ लागत नाही. फोटोतील या मुलीने चेह-यावर अंडरविअर घातलेली दिसतेय. हा फोटो शेअर करताना ट्विंकलने त्याला काय कॅप्शन द्यावे? तर ‘जेव्हा तुम्ही केजरीवालांचे चाहते असता आणि तुमच्याकडे माकड टोपी नसते,’ असे तिने लिहिले.



विशेष म्हणजे, ‘शप्पथ मी तिला असे काही करण्यासाठी सांगितलेले नाही,’ असा खुलासाही तिने केला आहे. या ट्वीटद्वारे ट्विंकलने एकप्रकारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांची फिरकी घेतली आहे. 

 ट्विंकलच्या या ट्वीटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. काहींना ट्विंकलचे हे वागणे खटकले तर काहींनी यावरून तिची जाम मजा घेतली.







एका युजरने चक्क चक्क, ‘पण ज्या अंडरविअरची अक्षय कुमार जाहीरात करतो तो हा ब्रँड नाही’, अशी प्रतिक्रिया दिली.
काही दिवसांपूर्वी ट्विंकलने स्वत:चा एक विचित्र ब्लॅक अँड व्हाइट फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. ‘आशा करते की तुम्हाला माझा हा नवा फोटो आवडेल.  मी आशा करते की, जेव्हा माझा मृत्यू होईल तेव्हा माझा हा फोटो मोठ्या फ्रेममध्ये सजवला जाईल आणि त्याच्या चारी बाजूंना फुलांची सजावट केली जाईल, असे विचित्र ट्वीटकेले होते.

Web Title: twinkle khanna funny tweet on arvind kejriwal goes viral