Tweet war : स्वरा भास्करने केआरके म्हटले ‘कॅरेक्टरलेस’
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2017 14:21 IST2017-02-21T08:45:24+5:302017-02-21T14:21:05+5:30
अभिनेत्री स्वरा भास्कर हिच्या आगामी ‘अनारकली आॅफ आरा’ या सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, या पोस्टवरून ...

Tweet war : स्वरा भास्करने केआरके म्हटले ‘कॅरेक्टरलेस’
अ िनेत्री स्वरा भास्कर हिच्या आगामी ‘अनारकली आॅफ आरा’ या सिनेमाचे नवे पोस्टर नुकतेच रिलीज करण्यात आले असून, या पोस्टवरून आता ट्विट वॉर रंगला आहे. अर्थातच यामध्ये कॉन्ट्रोव्हर्सी किंग म्हणून ओळखला जाणारा केआके अर्थात कमाल खान याचे नाव आघाडीवर असून, यावेळेस त्याने स्वरा भास्कर हिच्याशी पंगा घेतला आहे. मात्र स्वराने त्याला कुठलीही भीक न घालता असे काही सुनावले आहे की, पुन्हा केआरके स्वराशी पंगा घेताना किमान दहा वेळा तरी विचार करेल.
![]()
मुळात कमाल खान हा नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून एक प्रकारचा सिनेमाचा रिव्ह्यू एका वाक्यात सांगत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील बड्या स्टार्सवर टीका करून चर्चेत असतो. केआरकेने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतलेला असून, देशभक्तीवर आधारित एका सिनेमामध्ये तो झळकलेला आहे. अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. त्यामुळे आगामी काळात स्वरा विरुद्ध केआरके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अर्थात हा सामना सिनेमाच्या यशा-अपयशावर अवलंबून असेल.
}}}} ">Well done @ReallySwara for constantly breaking ground!! 24th march is the date guys ! For this new world and engaging film!!! pic.twitter.com/3zmuUvOIrO— Karan Johar (@karanjohar) February 20, 2017त्याचे झाले असे की, स्वराच्या ‘अनारकली आॅफ आरा’ या सिनेमाचे नवे पोस्टर रिलीज झाल्यानंतर दिग्दर्शक करण जोहर याने ट्विट करून तिचे तोंडभरून कौतुक केले. करणने ट्विटमध्ये म्हटले की, ‘शाब्बास स्वरा... तू सातत्याने केलेल्या प्रयत्नांसाठी!’ मात्र करणचे हे कौतुक केआरकेच्या काही पचनी पडले नाही, त्याने करणच्या ट्विटला रिप्लाय देत म्हटले की, ‘करण जोहर सर केआरकेच्या मते हा सिनेमा फ्लॉफ किंवा बेकार नसेल, तर या वर्षातला सुपर-डुपर बकवास सिनेमा असेल.’
Well done @ReallySwara for constantly breaking ground!! 24th march is the date guys ! For this new world and engaging film!!! pic.twitter.com/3zmuUvOIrO— Karan Johar (@karanjohar) February 20, 2017
}}}} ">Sir @karanjohar it will not be a flop or washout, but it will be super duper disaster of the year coz KRK says so. https://t.co/Ugu3GPfFxT— KRK (@kamaalrkhan) February 20, 2017मग काय, स्वराचा केआरकेचे हे ट्विट असे काही झोंबले की, त्याला उत्तर देणे तिने अगत्याचे समजले. क्षणाचाही विलंब न करता तिने केआरकेच्या ट्विटला उत्तर देत म्हटले की, ‘काही लोकांच्या शिव्याही कॉम्लिमेंट ठरतात. थॅँक्स कमाल राशिद खान... ज्या पद्धतीने अश्लीलता पसरविली आहे, त्यावरून हेच तुझे कॅरेक्टर सर्टिफिकेट असावे. खरोखर मला तुझे कौतुक करावेसे वाटतेय’ स्वराचा हा संताप असा काही होता की, पुन्हा केआरकेने स्वराच्या ट्विटला रिट्विट करण्याची हिंमत केली नाही.
Sir @karanjohar it will not be a flop or washout, but it will be super duper disaster of the year coz KRK says so. https://t.co/Ugu3GPfFxT— KRK (@kamaalrkhan) February 20, 2017
मुळात कमाल खान हा नेहमीच ट्विटरच्या माध्यमातून एक प्रकारचा सिनेमाचा रिव्ह्यू एका वाक्यात सांगत असतो. तो नेहमीच बॉलिवूडमधील बड्या स्टार्सवर टीका करून चर्चेत असतो. केआरकेने बिग बॉस या रिअॅलिटी शोमध्ये सहभाग घेतलेला असून, देशभक्तीवर आधारित एका सिनेमामध्ये तो झळकलेला आहे. अतिशय वादग्रस्त व्यक्तिमत्त्व म्हणून त्याच्याकडे बघितले जाते. त्यामुळे आगामी काळात स्वरा विरुद्ध केआरके असा सामना रंगण्याची शक्यता आहे. अर्थात हा सामना सिनेमाच्या यशा-अपयशावर अवलंबून असेल.
Kuch logon ki gaali, compliment hoti hai! :) Thanks @kamaalrkhan the unasked filth u spew is a character certificate for us!