OMG! तुषार कपूरने शेअर केला बाथरूम सेल्फी, सेलिना जेटलीला आठवलं ‘टॉनिक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2021 17:53 IST2021-09-27T17:52:33+5:302021-09-27T17:53:33+5:30

काही तासांपूर्वी तुषारने एक शर्टलेस सेल्फी शेअर केला. हा सेल्फी पाहून नेटक-यांनी तुषारला ट्रोल करायला सुरूवात केली.

tusshar kapoor got trolled on sharing shirtless pictures on social media | OMG! तुषार कपूरने शेअर केला बाथरूम सेल्फी, सेलिना जेटलीला आठवलं ‘टॉनिक’

OMG! तुषार कपूरने शेअर केला बाथरूम सेल्फी, सेलिना जेटलीला आठवलं ‘टॉनिक’

ठळक मुद्देतुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा.  2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता.

बॉलिवूडचा अभिनेता तुषार कपूर  (Tusshar Kapoor) सध्या बॉलिवूडमधून गायब आहे. पण सोशल मीडियावर मात्र चांगलाच अ‍ॅक्टिव्ह आहे. काही तासांपूर्वी तुषारने एक शर्टलेस सेल्फी शेअर केला. हा शर्टलेस सेल्फी शेअर करण्यामागचा त्याचा उद्देश आम्हाला ठाऊक नाही. पण हो, हा सेल्फी पाहून नेटक-यांनी तुषारला ट्रोल करायला सुरूवात केली. आश्चर्य म्हणजे, अगदी अभिनेत्री सेलिना जेटली हिनेही तुषारला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
जितेन्द्रचा मुलगा आणि एकता कपूरचा भाऊ तुषारने इन्स्टाग्रामवर स्वत:चे दोन फोटो शेअर केलेत.

त्याची ही पोस्ट क्षणात व्हायरल झाली आणि पाठोपाठ नेटक-यांच्या कमेंट्सही सुरू झाल्यात. बूढे हो गये गुरू..., अशा शब्दांत एका युजरने त्याला ट्रोल केले. तर अन्य एका युजरने ‘बूढे लग रहे हो रामू काका,’ म्हणत त्याच्या या फोटोंची खिल्ली उडवली. 
अभिनेत्री सेलिना जेटली हिनेही तुषारची फिरकी घेतली. ‘हमदर्द का टॉनिक सिंकारा... चांगला पर्याय ठरू शकतो,’ अशी कमेंट तिने केली.

तुषार कपूर हा दिग्गज अभिनेते जितेंद्र आणि निर्मात्या शोभा कपूर यांचा धाकटा मुलगा.  2001 मध्ये मुझे कुछ कहना है चित्रपटातून त्याने डेब्यू केला होता. कुछ तो है, गायब, खाकी असा काही सिनेमात झळकल्यानंतर क्या कूल है हम या चित्रपटामुळे त्याला विनोदी अभिनेता म्हणून ओळख मिळाली. त्यानंतर गोलमाल सिरीजमुळे तो आणखी लोकप्रिय झाला. यानंतर अनेक वर्ष तुषार चित्रपटांत दिसला नाही. पुढे काही मोजक्या सिनेमात तो दिसला. आता तो निर्माता बनला आहे.

तुषार कपूरनं लग्न का केलं नाही?

44 वर्षाच्या तुषारने अद्याप लग्न केलेले नाही. पण तो एका मुलाचा बाप आहे. सरोगसीच्या माध्यमातून त्याने मुलाला जन्म दिला.  लग्न कधी करणार?असा प्रश्न तुषारला केला जातो. पण तुषारचे म्हणाल तर लग्न न करण्याच्या निर्णयावर तो ठाम आहे. ‘मी सिंगल आहे आणि यातच आनंदी आहे. आत्ताच नाही तर भविष्यातही लग्न करण्याचा माझा कुठलाही इरादा नाही. लग्न न करण्याच्या निर्णयावर मी ठाम आहे. खरं सांगायचे तर मी स्वत:ला अन्य कुणासोबत शेअर करू इच्छित नाही. मी बाप आहे. माझा मुलगा लक्ष्य रोज मला काहीतरी नवीन शिकवत असतो. याशिवाय कुठला पर्याय मला निवडायचा नाही. मी स्वत:ला इतरांसोबत शेअर करु शकत नाही,’ असे तुषार म्हणालाहोता.

Web Title: tusshar kapoor got trolled on sharing shirtless pictures on social media