'या' अभिनेत्रीची 'तुंबाड २'मध्ये एन्ट्री, सोहम शाहच्या हॉरर थ्रिलरबद्दल मोठे अपडेट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2025 12:22 IST2025-09-30T12:20:56+5:302025-09-30T12:22:02+5:30
'तुंबाड २' या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.

'या' अभिनेत्रीची 'तुंबाड २'मध्ये एन्ट्री, सोहम शाहच्या हॉरर थ्रिलरबद्दल मोठे अपडेट!
Tumbbad Sequel : बॉलिवूडच्या सर्वोत्तम हॉरर थ्रिलर चित्रपटांमध्ये 'तुंबाड'चा समावेश होतो. 'तुंबाड' (Tumbbad) हा सिनेमा २०१८ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील हस्तर या राक्षासामुळे प्रेक्षकांना अक्षरश: खिळवून ठेवलं. त्यानंतर हा सिनेमा पुन्हा प्रदर्शित केल्यानंतर प्रेक्षकांनीही तितकंच प्रेम सिनेमाला दिलं. या यशामुळे, 'तुंबाड'च्या सिक्वेलची म्हणजेच 'तुम्बाड २' ची घोषणा करण्यात आली आहे. आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाबद्दल एक मोठे अपडेट समोर आले आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'तुंबाड'चे मुख्य अभिनेता आणि दिग्दर्शक सोहम शाहने 'तुंबाड'साठी एका प्रसिद्ध अभिनेत्रीशी संपर्क साधला आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून 'क्वीन' कंगना राणौत आहे. सोहम आणि कंगना यांना एका हॉरर थ्रिलरमध्ये एकत्र पाहणे चित्रपटप्रेमींसाठी एक मेजवानी ठरेल. मात्र, याबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
सोहम शाह 'तुंबाड २' मध्ये मुख्य अभिनेता असण्यासोबतच चित्रपटाचे दिग्दर्शनही करणार आहे. 'तुंबाड'च्या सिक्वेलचे चित्रिकरण २०२६ च्या सुरुवातीला सुरू होऊ शकते. 'तुंबाड २' हा एक मोठा बजेटचा चित्रपट असू शकतो, ज्याचा अंदाजे खर्च १५० कोटी रुपये असेल अशी माहिती मिळत आहे.
'तुंबाड' हा चित्रपट २०१८ मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाला तेव्हा त्याने बॉक्स ऑफिसवर केवळ ७ कोटींची कमाई केली होती. मात्र, २०२४ मध्ये तो पुन्हा प्रदर्शित झाल्यावर, त्याने सुमारे ४० कोटींची कमाई करत एक मजबूत कलेक्शन मिळवले. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या पाच हिंदी चित्रपटांमध्ये 'तुंबाड'चा समावेश होतो. 'तुंबाड'च्या यशानंतर आता 'तुंबाड २' कडून प्रेक्षकांना मोठ्या अपेक्षा आहेत. त्यात कंगना राणौतची एन्ट्री झाल्यास हा चित्रपट आणखी रोमांचक ठरू शकतो.