Video: 'तू है मेरी किरण' म्हणत गौरव मोरेने जुही चावलावर उधळली फुलं, हिंदी शोमधील व्हिडीओ गाजतोय
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2024 13:42 IST2024-04-23T13:39:45+5:302024-04-23T13:42:23+5:30
गौरव मोरे - जूही चावला यांचा एक धम्माल व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. क्लिक करुन तुम्हीही बघा

Video: 'तू है मेरी किरण' म्हणत गौरव मोरेने जुही चावलावर उधळली फुलं, हिंदी शोमधील व्हिडीओ गाजतोय
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधील सर्वांचा लाडका अभिनेता म्हणजे गौरव मोरे. 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून गौरवने सर्वांना खळखळून हसवलं. गौरव सध्या हिंदी शो 'मॅडनेस मचाएंगे' मधून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. गौरव त्याच्या अभिनयातून हा हिंदी शो सुद्धा गाजवत आहे. अभिनेता कुशल बद्रिके आणि अभिनेत्री हेमांगी कवी हे मराठी कलाकार सुद्धा या शो मध्ये झळकत आहेत.
'मॅडनेस मचाएंगे' च्या नवीन शोमध्ये अभिनेत्री जूही चावला सहभागी होत्या. त्यावेळी गौरव मोरेने शाहरुख खानच्या 'जादू तेरी नजर' गाण्यावर डान्स करुन जूही चावला यांच्यावर फुलं उधळली. जूही यांनीही गौरवसोबत खास रोमँटिक डान्स केला. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री 'मॅडनेस मचाएंगे' मध्ये चांगलीच गाजली. पुढे गौरव - जुही या दोघांची विनोदी जुगलबंदीही पाहायला मिळतेय.
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शो गाजवल्यावर गौरव सध्या 'मॅडनेस मचाएंगे' या शोमध्ये झळकत आहे. काहीच दिवसांपुर्वी गौरवची या शोमध्ये एन्ट्री झाली. 'मॅडनेस मचाएंगे' शोमध्ये झळकत असल्याने गौरवने 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' शोमधून सध्या ब्रेक घेतलाय अशी चर्चा आहे. दरम्यान 'फिल्टरपाड्याचा बच्चन' अशी स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या गौरव मोरेने गेल्या काही वर्षात विविध सिनेमांमध्येही काम केलंय