आदिपुरुष सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती.

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2021 11:47 IST2021-03-15T11:44:40+5:302021-03-15T11:47:25+5:30

त्यामुळे पुन्हा एकदा तिला रुपेरी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच एक मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे. Trupti Toradmal Dream comes true on her Bollywood debut with Prabhas.

Trupti Toradmal on her Bollywood debut with Prabhas starrer 'Adipurush': Its a dream come true moment for her | आदिपुरुष सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती.

आदिपुरुष सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती.

आपल्या पहिल्यावहिल्या सिनेमातून अभिनेत्री तृप्ती तोरडमलने फॅन्स आणि समीक्षकाची मनं जिंकली. स्वप्ना जोशी यांच्या 'सविता दामोदर परांजपे' या सिनेमातून ती रसिकांच्या भेटीला आली. आपल्या अभिनयाप्रमाणेच सौंदर्याने जादू करणारी तृप्ती आता थेट बॉलिवुडचा बिग बजेट समजला जाणारा  'आदिपुरुष' सिनेमात झळकणार आहे.

खुद्द तृप्तीनेच  सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत  चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिने इन्स्टाग्राम अकाउंटवर सिनेमाच्या मुहूर्ताची सुरुवात झाल्याचा फोटो चाहत्यांसोबत शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी देखील तिला या प्रोजेक्ट्साठी शुभेच्छा दिल्या आहेत. कमेंट्स लाईक्स देत चाहते तिच्या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव ही करत आहेत.

या सिनेमाच्या शूटिंगला ही सुरुवात झाली आहे. सिनेमातल्या तिच्या भूमिकेविषयी फारशी माहिती समोर आली नसली तरीही तिने  या  भूमिकेसाठी खूप मेहनत   घेतली आहे.त्यामुळे पुन्हा एकदा तिला रुपेरी पडद्यावर पाहणे चाहत्यांसाठी नक्कीच एक मनोरंजनाची पर्वणीच असणार आहे.


दिग्दर्शक ओम राऊत याचं दिग्दर्शन असलेल्या या सिनेमात दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता प्रभास मुख्य भूमिका साकारणार आहे. त्यासोबत बॉलिवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री क्रिती सेनॉन यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाची घोषणा झाल्यापासून  चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे.

तृप्ती फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. फिट ठेवणं हीसुद्धा काळाची गरज आहे. त्यामुळे तृप्ती देखील फिटनेसवर विशेष लक्ष देते. जिममध्ये  किंवा घरच्या घरी व्यायाम अथवा योगासन करत ती स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करतांना दिसते.तिचे वर्कआऊट व्हिडिओ इतरांनाही नक्कीच वर्कआऊट साठी प्रेरणा देतात.

Web Title: Trupti Toradmal on her Bollywood debut with Prabhas starrer 'Adipurush': Its a dream come true moment for her