'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 19:43 IST2024-03-22T19:43:28+5:302024-03-22T19:43:52+5:30

Tripti Dimri : 'ॲनिमल' फेम 'भाभी २' फेम तृप्ती डिमरीबाबत मोठे वृत्त समोर येत आहे. तृप्तीने साऊथचा एक मोठा सिनेमा सोडून कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया ३' सिनेमात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.

Trupti Dimri turned down a big film from the South for 'Bhool Bhulaiya 3', this Bollywood actress made a bet. | 'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी

'भूल भुलैया ३'साठी तृप्ती डिमरीनं नाकारला साऊथचा मोठा सिनेमा, या बॉलिवूड अभिनेत्रीनं मारली बाजी

'ॲनिमल' नंतर तृप्ती डिमरीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली आहे. रणबीर कपूरच्या 'ॲनिमल' चित्रपटात काम केल्यानंतर तिचे नशीब बदलले. तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. यंदाच्या दिवाळीला ती कार्तिक आर्यनसोबत 'भूल भुलैया ३'मध्ये दिसणार आहे. दरम्यान, अशी बातमी समोर आली आहे की, तिला साऊथ सिनेइंडस्ट्रीतील एका मोठ्या चित्रपटाची ऑफरही आली होती, मात्र त्याऐवजी तिने कार्तिकसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

तृप्ती डिमरीने नाकारलेल्या साऊथ सिनेमाचं नाव आहे ‘टॉक्सिक.’ यात केजीएफ फेम यश मुख्य भूमिकेत आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाच्या निर्मात्यांना यशसोबत तृप्ती डिमरी कास्ट करायचे होते. पण, तृप्तीने कार्तिकच्या 'भूल भुलैया ३'ची निवड केली. त्यानंतर निर्मात्यांनी यशच्या चित्रपटासाठी बॉलिवूडच्या दुसऱ्या अभिनेत्रीला कास्ट केले.

यशच्या 'टॉक्सिक'मध्ये लागली या अभिनेत्रीची वर्णी

रिपोर्टमध्ये असेही सांगितले जात आहे की यशचा 'टॉक्सिक'मध्ये आता कियारा आडवाणीची वर्णी लागली आहे. या चित्रपटात यशसोबत कियारा दिसणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. याव्यतिरिक्त कियाराकडे रणवीर सिंग स्टारर 'डॉन ३' आहे. एकीकडे तृप्ती 'टॉक्सिक'चा भाग बनली नसताना, तो चित्रपट कियाराला मिळाला आहे, तर दुसरीकडे 'भूल भुलैया ३'मध्ये तृप्तीने कियाराची जागा घेतली आहे. वास्तविक, कियारा अडवाणी 'भूल भुलैया २' मध्ये दिसली होती, पण तिसऱ्या भागातून ती बाहेर पडली होती. काही काळापूर्वी 'भूल भुलैया ३'साठी तृप्तीच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, ‘टॉक्सिक’ बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट २०२५ मध्ये प्रदर्शित होणार आहे. 
 

Web Title: Trupti Dimri turned down a big film from the South for 'Bhool Bhulaiya 3', this Bollywood actress made a bet.