ट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचतेस, निघून जा पाकिस्तानात’, रिचा चढ्ढाने दिले रोखठोक उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2018 20:48 IST2018-04-12T15:18:09+5:302018-04-12T20:48:15+5:30

‘फुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटात बोल्ड भूमिका ...

Trollar said, 'You dances for money, go to Pakistan', Richa responded with a loud cry! | ट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचतेस, निघून जा पाकिस्तानात’, रिचा चढ्ढाने दिले रोखठोक उत्तर!

ट्रोलरने म्हटले, ‘तू पैशांसाठी नाचतेस, निघून जा पाकिस्तानात’, रिचा चढ्ढाने दिले रोखठोक उत्तर!

ुकरे’ आणि ‘फुकरे रिटर्न्स’मध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारी अभिनेत्री रिचा चढ्ढा सध्या चांगलीच चर्चेत आहे. चित्रपटात बोल्ड भूमिका साकारणारी रिचा रिअल लाइफमध्येही तेवढीच बोल्ड आहे. असो, यावेळेस रिचाने सोशल साइटवर ट्रोल करणाºयांना सडेतोड उत्तर दिल्याने ती चर्चेत आली आहे. त्याचे झाले असे की, ट्विटरवर एका युजरने रिचाच्या ट्विटला रिट्विट करताना लिहिले की, ‘तू स्वत: पैशांसाठी नाचतेस, मग दुसºयांना नैतिकतेचे धडे का देतेस?, निघून जा पाकिस्तानात. आम्हाला तुझ्यासारख्या अ‍ॅँटी नॅशनॅलिस्टची आवश्यकता नाही.’ रिचाने या युजरला अतिशय बेधडकपणे उत्तर देत त्याची बोलती बंद केली. 

रिचाने लिहिले की, ‘हा पेड ट्रोल आहे. पेड ट्रोल करणारे कधीच त्यांचे खरे नाव सांगत नाहीत, तसेच स्वत:चा डीपीही ठेवत नाहीत.’ यानंतर युजरने रिचाला विचारले की, तुला कसे माहीत की हे पेड ट्रोल आहे? तसेच तू कितीवेळा पेड ट्रोल केले आहे? रिचाने या युजरला जशास तसे उत्तर देताना लिहिले की, ‘एकदाही नाही, कारण मी रिचा आहे आणि मी विकली जात नाही. मी असे ऐकले की, पेड ट्रोल करणाºया प्रत्येक ट्विटला १० डॉलर दिले जातात. मला तुझा अकाउंट नंबर दे मी त्याच्यात पैसे ट्रान्सपर करते. 

दरम्यान, या अगोदरही रिचाने ‘पेड ट्रोल’ करणाºयांचा समाचार घेतला आहे. रिचाने याअगोदर म्हटले होते की, एकदा सोशल नेटवर्क साइटवर कोण्यातरी पेड ट्रोल करणाºया व्यक्तीने माझ्याबद्दल लिहिले होते की, मी अ‍ॅँटी हिंदू आहे. त्या ट्रोलरचे नाव फेक होते, पत्ताही फेक होता. तेव्हा मला असे वाटले की, जर व्यक्तीच फेक आहे तर त्याच्या कॉमेण्टवर वाईट कशाला वाटून घ्यायचे. यावेळी रिचाने त्या युजरला लिहिले होते की, तू नोकरी का करीत नाहीस? त्यावर ट्रोलरने सांगितले होते की, ट्रोल करणेच माझे प्रोफेशन आहे. मी नोकरीसाठी त्या ट्रोलरला मदत करण्याचाही प्रयत्न केला, परंतु नंतर त्याने मला ब्लॉक केले, असेही रिचाने सांगितले. 

Web Title: Trollar said, 'You dances for money, go to Pakistan', Richa responded with a loud cry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.