शाहरुखच्या लेकीला टाकलं मागे; लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 'ही' अभिनेत्री अव्वल स्थानावर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 04:53 PM2023-12-15T16:53:52+5:302023-12-15T16:56:12+5:30

तृप्ती डिमरीला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली असून सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे.

Triptii Dimri beats star kids Suhana Khan & Khushi Kapoor to become the Most Popular Indian Celebrity of IMDb | शाहरुखच्या लेकीला टाकलं मागे; लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 'ही' अभिनेत्री अव्वल स्थानावर

शाहरुखच्या लेकीला टाकलं मागे; लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीत 'ही' अभिनेत्री अव्वल स्थानावर

अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘ॲनिमल’ सिनेमा  बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई करत आहे. चित्रपटातील फक्त काही मिनिटांच्या इंटिमेट सीनमुळे अभिनेत्री तृप्ती डिमरी हिने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे. तृप्ती हिला नॅशनल क्रश म्हणून ओळख मिळाली असून सध्या सर्वत्र फक्त आणि फक्त तृप्ती हिची चर्चा रंगली आहे.  फक्त लोकांच्या मनातचं नाही तर आयएमडीबीच्या लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींच्या यादीतही तृप्तीने स्थान मिळवलं आहे. 

चित्रपट, टीव्ही आणि सेलिब्रिटी विश्वातील सर्वांत प्रसिद्ध स्रोत असलेल्या IMDb ने लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटींची घोषणा केली. यात अव्वल स्थानावर तृप्ती डिमरी आहे. तर तृप्ती डिमरीने किंग खानची लेक सुहानालाही मागे टाकलं आहे. या यादीत सुहाना ही सातव्या तर खुशी कपूरही आठव्या क्रमाकांवर आहेत. शिवाय, संदीप रेड्डी वांगा हे दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत दिग्दर्शक झोया अख्तर, डंकीचे दिग्दर्शक राजकुमार हिरानी आणि  'रॉकी भाई' म्हणजेच अभिनेता यश यांचाही समावेश आहे. 

तृप्तीची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत असून चाहत्या वर्गातही भर पडली आहे. 'ॲनिमल'नंतर तृप्ती 'मेरे मेहबूब मेरे सनम' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात ती विकी कौशलबरोबर स्क्रीन शेअर करणार आहे. राजकुमार रावच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडीओ' या सिनेमातही ती महत्त्वाच्या भूमिकेत आहे.  'ॲनिमल'आधी तृप्तीने अनेक बॉलिवूड सिनेमांत काम केलं आहे. 'कला', 'पोस्टर बॉईज', 'लैला मजनू', 'बुलबूल' या चित्रपटांत ती झळकली आहे. पण, ‘अ‍ॅनिमल’ हा तिच्या करिअरचा टर्निंग पॉइंट ठरला आहे.

Web Title: Triptii Dimri beats star kids Suhana Khan & Khushi Kapoor to become the Most Popular Indian Celebrity of IMDb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.