​‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2016 13:14 IST2016-12-07T10:24:42+5:302016-12-07T13:14:31+5:30

लिजेंडरी अ‍ॅक्टर दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पायांची सूज आणि ताप आल्यामुळे त्यांची पत्नी ...

'Tragedy King' admitted to hospital in Dilip Kumar | ​‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

​‘ट्रॅजेडी किंग’ दिलीप कुमार रुग्णालयात दाखल

जेंडरी अ‍ॅक्टर दिलीप कुमार यांना मुंबईच्या लिलावती रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. पायांची सूज आणि ताप आल्यामुळे त्यांची पत्नी सायरा बाूनने त्यांना मंगळवारी (दि. ६) रुग्णालयात दाखल केले.

विशेष म्हणजे येत्या रविवारी (दि. ११) दिलीप साहेबांचा ९४ वा वाढदिवस असून त्या आधी आम्ही त्यांना घरी नेऊ अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

त्यांनी सांगितले की, नेहमीप्रमाणे मी त्यांना नियमित वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन जाण्याची तयारी करीत होते. त्यांच्या पायांवर सूज पाहून मात्र मी त्वरित रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांपासूने त्यांना थंडीमुळे सर्दी-खोकल्याचाही त्रासदेखील जाणवत आहे. दिलीप साहेबांच्या स्वास्थ्याशी निगडित मी कोणतीच गोष्ट दुलर्क्षित करीत नाही, मग ती कितीही क्षुल्लक असो.


टाईमलेस कपल : दिलीप कुमार आणि सायरा बानू

दिलीप कुमार तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीमध्ये असून त्यांची तब्येत आता ठीक आहे. त्यांनी ट्विटकरून तब्येत ठीक असल्याचे कळवले. त्यांना अशाप्रकारे हॉस्पिटलमध्ये भरती करण्याची यावर्षातील ही दुसरी वेळ आहे. याआधी त्यांना तीव्र ताप आल्यामुळे अ‍ॅडमिट करावे लागले होते. भावनिक झालेल्या बानू म्हणाल्या की, ‘त्यांच्या वाढदिवसापूर्वीच आम्ही त्यांना घरी घेऊन जाऊ अशी मी देवाकडे प्रार्थना करते.’
 दिलीप कुमारांचे मूळ नाव युसूफ खान आहे. मोठ्या पडद्यावर त्यांनी ‘दिलीप कुमार’ हे नाव धारण केले. ‘ट्रॅजेडी किंग’ म्हणून ते प्रसिद्ध असलेल्या दिलीपसाहेबांनी ‘देवदास’, ‘मुघल-ए-आझम’, ‘गंग जमुना’, ‘नया दौर’ आणि ‘मधुमती’ अशा अनेक लोकप्रिय चित्रपटांतून काम केले. ‘किला’ (१९९८) ही त्यांची शेवटची फिल्म होती. ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ (१९९४) आणि गेल्या वर्षी पद्म विभूषण पुरस्काराने त्यांना नावाजण्यात आलेले आहे.

लिजेंडस् क्लब :अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि दिलीप कुमार

त्यांनी लवकर बरे होऊन ११ डिसेंबर रोजी मोठ्या जल्लोषात वाढदिवस साजरा करावा अशी ‘सीएनएक्स मस्ती’ टीम कामना करते.

Web Title: 'Tragedy King' admitted to hospital in Dilip Kumar