तुमची हॅलोविन पार्टी होईल आणखी खास, पाहा हे थरारक चित्रपट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 07:56 PM2023-10-31T19:56:17+5:302023-10-31T20:02:35+5:30

आजकाल सोशल मीडिया, हॉलिवूड सिनेमा, वेबसीरीज याच्या माध्यमातून हॅलोविनबाबत भारतीयांच्या मनातही उत्सुकता वाढली आहे.

To make your Halloween party even more special, watch these thrilling movies | तुमची हॅलोविन पार्टी होईल आणखी खास, पाहा हे थरारक चित्रपट

तुमची हॅलोविन पार्टी होईल आणखी खास, पाहा हे थरारक चित्रपट

दरवर्षी 31 ऑक्टोबर दिवशी हॅलोविन साजरं केलं जातं. आजकाल सोशल मीडिया, हॉलिवूडसिनेमा, वेबसीरीज याच्या माध्यमातून हॅलोविनबाबत भारतीयांच्या मनातही उत्सुकता वाढली आहे. भारतामध्येही काही मंडळी हॅलोविन सेलिब्रेशन करतात. तुमची हॅलोविन पार्टी खास करण्यासाठी आम्ही खास काही थरारक चित्रपटांची यादी घेऊन आलो आहोत. तर पाहुयात कोणते आहेत ते चित्रपट. 

बुलबुल

बुलबुल या चित्रपटात तृप्ती डिमरीचा  भितीदायक अवतार पाहायला मिळत आहे. बुलबूल भयपट असूनही, परीकथेच्या अंगानं जात सर्वच प्रकारच्या प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यात यशस्वी ठरतो.


गेम ओव्हर

सायकॉलॉजिकल थ्रिलर असलेला हा चित्रपट पॅरानॉर्मल आणि हॉरर अ‍ॅक्टिव्हिटीवर आधारित आहे. तापसी पन्नूच्या मुख्य भूमिकेने हा चित्रपट आणखी दमदार बनवला आहे. नेटफ्लिक्सवर तमिळमध्ये बनलेला हा हॉरर चित्रपट तुम्ही हिंदीमध्ये पाहू शकता.

'द नन' आणि  'द नन 2' 

2018 मध्ये रिलीज झालेल्या 'द नन' या चित्रपटाचा सिक्वेल 'द नन 2' थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. 'द नन' चित्रपटाची कथा जिथून संपते तिथून या चित्रपटाची कथा सुरू होते. हे दोन्ही चित्रपट बेस्ट हॉररपटांपैकी एक आहे.

स्ट्रेंजर थिंग्स
स्ट्रेंजर थिंग्स हे विज्ञानकथा आणि भयपट यांचा उत्तम संगम आहे.  नवीन ट्विस्टसह स्ट्रेंजर थिंग्स हे धडकी भरवणारे आहे. 

काश्मोरा

या चित्रपटात एका व्यक्तीची कथा दाखवण्यात आली आहे, जो स्वत: तांत्रिक बनून लोकांकडून पैसे उकळतो आणि एक दिवस तो झपाटलेल्या महालात अडकतो. चित्रपटात हॉररसोबतच कॉमेडीची छटाही आहे.  हा चित्रपट हॉटस्टारवर उपलब्ध आहे.

ऑल ऑफ अस आर डेड 

 एका शिक्षकाचा प्रयोग फेल होतो आणि सर्वत्र झोम्बी दिसू लागतात. या झोम्बी बेस्ड हॉरर चित्रपट विश्वासघात, प्रेम आणि मैत्री दाखवण्यात आली आहे.

Web Title: To make your Halloween party even more special, watch these thrilling movies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.