टिस्काच्या ‘चटनी’ ची चव न्यारी!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2016 14:30 IST2016-11-26T14:30:04+5:302016-11-26T14:30:04+5:30
आता हेच पाहा ना! तिच्या ‘चटनी’ नावाच्या एका शॉर्टफिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटाची ती केवळ निर्माता नसून लेखक आणि मुख्य कलाकार देखील आहे.

टिस्काच्या ‘चटनी’ ची चव न्यारी!
'तारें जमीं पर'' चित्रपटात ईशानच्या आईची भूमिका करणारी टिस्का चोप्रा आठवतेय ना? टिस्का ही एक अशी अभिनेत्री आहे जी चित्रपटाची मुख्य अभिनेत्री होण्यासाठी कधीच धडपड करत नाही. भूमिका जर चांगली असेल तर ती शॉर्टफिल्म करायलाही उत्साहाने तयार होते. आता हेच पाहा ना! तिच्या ‘चटनी’ नावाच्या एका शॉर्टफिल्मचा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. या चित्रपटाची ती केवळ निर्माता नसून लेखक आणि मुख्य कलाकार देखील आहे.
४२ वर्षीय एका गृहिणीची भूमिका ती या शॉर्टफिल्ममध्ये करतेय. तिचा नॉन ग्लॅमरस लुक चित्रपटाचा केंद्रबिंदू ठरेल. शॉर्ट फिल्ममध्ये तिच्या पतीशी संबंधित काही घरगुती प्रश्नांच्या विषयावर ती प्रभावी भूमिका करतांना दिसेल. असुरक्षितता, वैवाहिक नातेसंबंध या प्रश्नांवर शॉर्टफिल्मच्या माध्यमातून प्रकाश टाक ण्यात आला आहे. शॉर्टफिल्मला देण्यात आलेले ‘चटनी’ हे नाव काहीसे हटके वाटतेय. नक्कीच तुम्ही या चटनीची चव कधीही चाखली नसणार.
टिस्का चोप्रा हिने काही चित्रपटांमध्ये छोट्याशा भूमिका केल्या असल्या तरीही भूमिकेची जाण तिला आहे. शूटिंग करत असताना त्या भूमिकेत ती टिस्का चोप्रा म्हणून नव्हे तर ती भूमिका म्हणून जगते. चित्रपटात मोठे स्टारकास्ट असतील तरीही ती तिला मिळालेली भूमिका अतिशय उत्तमप्रकारे साकारते. प्रेक्षकांच्या मनात तिची भूमिका घर करून राहते. आता तिने बनवलेली ही ‘चटनी’ प्रेक्षकांना तिखट , गोड की आंबट हे वेळच सांगेल!